शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल, कोटींच्या फसवणुकीचा आरोप

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसून येत नाहीय. पॉर्न प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा आता फसवणुकीच्या प्रकरणात अडकला  आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली आहे.

शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल, कोटींच्या फसवणुकीचा आरोप
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 12:52 PM

मुंबई : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसून येत नाहीय. पॉर्न प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा आता फसवणुकीच्या प्रकरणात अडकला  आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिल्पा-राज विरोधात FIR कुणी केला?

नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा एफआयआर दाखल केला आहे. नितीन बरई यांनी पोलिस तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शिल्पा आणि राज यांच्यावर 1.51 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2014-2015 मध्ये फिटनेस कंपनीच्या माध्यमातून 1.51 कोटींची फसवणूक केल्याचे नितीन बोरई यांचं म्हणणं आहे.

शिल्पा- राज कुंद्राविरुद्ध गुन्ह्याची नोंद

नितीन बरई यांच्या तक्रारीनंतर मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध कलम 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत. पैशांच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कसून चौकशी होऊ शकते.

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला खावी लागली जेलची हवा

पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी बऱ्याच दिवस राज कुंद्रा तुरुंगात होता. राज कुंद्राची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजने मीडियापासून ठराविक अंतर ठेवलं आहे. राज मीडियासमोर येत नाही. कुठलीही स्पष्टीकरण, खुलासे दात नाहीय. त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले आहे. आता दोन महिन्यांनंतर सगळं काही चांगलं होईल असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा शिल्पा आणि राजच्या आयुष्यात वादळ आलं आहे.

हे ही वाचा :

सेम ड्रेस, फिलिंगही सेम, राजकुमार पत्रलेखाचं अनोखं प्रेम, गुडघ्यावर बसून प्रपोज, पाहा रोमँटिक Video

Happy Birthday Vikas Khanna | कधीकाळी आई-आजीसोबत पराठे विकायचा, आता जगातील प्रसिद्ध शेफ म्हणून ओळखला जातोय विकास खन्ना!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.