मुंबई : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसून येत नाहीय. पॉर्न प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्रा आता फसवणुकीच्या प्रकरणात अडकला आहे. या प्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नितीन बरई नावाच्या व्यक्तीने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा एफआयआर दाखल केला आहे. नितीन बरई यांनी पोलिस तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शिल्पा आणि राज यांच्यावर 1.51 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2014-2015 मध्ये फिटनेस कंपनीच्या माध्यमातून 1.51 कोटींची फसवणूक केल्याचे नितीन बोरई यांचं म्हणणं आहे.
नितीन बरई यांच्या तक्रारीनंतर मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध कलम 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत. पैशांच्या फसवणुकीप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची कसून चौकशी होऊ शकते.
पॉर्न व्हिडीओ बनवून अपलोड केल्याप्रकरणी बऱ्याच दिवस राज कुंद्रा तुरुंगात होता. राज कुंद्राची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजने मीडियापासून ठराविक अंतर ठेवलं आहे. राज मीडियासमोर येत नाही. कुठलीही स्पष्टीकरण, खुलासे दात नाहीय. त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले आहे. आता दोन महिन्यांनंतर सगळं काही चांगलं होईल असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा शिल्पा आणि राजच्या आयुष्यात वादळ आलं आहे.
हे ही वाचा :
सेम ड्रेस, फिलिंगही सेम, राजकुमार पत्रलेखाचं अनोखं प्रेम, गुडघ्यावर बसून प्रपोज, पाहा रोमँटिक Video