खान अभिनेता वादाच्या भोवऱ्यात; आंबोली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल

खान अभिनेताच्या अडचणींमध्ये मोठी वाढ; याआधी देखील अभिनेत्यावर अनेक प्रकरणांमुळे गुन्हा दाखल... बॉलिवूडमध्ये सर्वत्र अभिनेत्याची चर्चा..

खान अभिनेता वादाच्या भोवऱ्यात; आंबोली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 1:10 PM

मुंबई | बॉलिवूडमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अभिनेता साहिल खान आणि इतरांविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या सर्वत्र साहिल खान याची चर्चा रंगत आहे. फिर्यादीने अभिनेता साहिल खान याच्याविरुद्ध ऑनलाइन सोशल मीडियावर बदनामीचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता साहिल खान वर सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप आहे. साहिल विरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या फिर्यादीचं नाव मनीष गांधी असं आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून विविध कलमांखाली एफआयआर नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

शनिवारी जेव्हा मनीष गांधी (46) साहिल खान विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात आले तेव्हा ही धक्कादायक गोष्ट उघडकीस आली. एफआयआरनुसार, एबीईसीएल या प्रदर्शन कंपनीचे मालक गांधी यांनी खानसोबत काम करण्यास नकार दिला होता. ही गोष्ट अभिनेत्याला खटकल्यानंतर साहिलने गांधी आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

साहिल खान पहिल्यांदा वादाच्या भोवऱ्यात अडकला नसून याआधी देखील अनेकदा अभिनेता अडचणीत अडकला आहे. 2021 मध्ये, त्याच्यावर माजी मिस्टर इंडिया स्पर्धक मनोज पाटील यांची बदनामी आणि छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. एवढंच नाही तर त्यानंतर मनोज पाटील याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. फिटनेस इंडस्ट्रीतील आणखी एक प्रतिस्पर्धी आयशा श्रॉफ हिची फसवणूक केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे साहिल खान?

साहिल खान एक बॉलिवूड अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.

‘स्टाईल’नंतर साहिल ‘एक्सक्यूज मी’, ‘डबल क्लास’, ‘ये है जिंदगी’ अशा केवळ मोजक्याच सिनेमांमध्ये दिसला. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमा करु शकले नाहीत. दुर्बल कथेमुळे साहिलच्या बॉलिवूड कारकिर्दीचा आलेख हळूहळू खाली येऊ लागला.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.