Kantara: ‘कांतारा’ चित्रपटातील ‘भूत कोला’ परंपरेचा वाद; अभिनेत्याविरोधात FIR दाखल

सोशल मीडियावर 'कांतारा'ची जोरदार चर्चा; अभिनेत्याच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

Kantara: 'कांतारा' चित्रपटातील 'भूत कोला' परंपरेचा वाद; अभिनेत्याविरोधात FIR दाखल
KantaraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2022 | 4:54 PM

मुंबई- ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) दिग्दर्शित ‘कांतारा’ (Kantara) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दक्षिण कर्नाटकातील तुलूनाडू क्षेत्राच्या संस्कृतीला या चित्रपटात अत्यंत सुंदरतेने दाखवल्याचं कौतुक नेटकरी करत आहेत. कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. सध्या सोशल मीडियावरही याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

इतर भाषिक प्रेक्षकांची उत्सुकता पाहिल्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाला हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित केलं. हिंदी आणि तेलुगू भाषेतही ‘कांतारा’ची दमदार कमाई होत आहे. ‘कांतारा’मधील ‘भूत कोला’ परंपरेला स्क्रीनवर पाहून प्रेक्षक आश्चर्यचकीत होत आ्हेत. या चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या कामगिरीचंही जोरदार कौतुक होत आहे. मात्र याच ‘भूत कोला’बाबत प्रतिक्रिया दिल्याने आता एका कन्नड अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

कर्नाटक पोलिसांनी कन्नड अभिनेता चेतन कुमार उर्फ चेतन अहिंसाविरोधातील तक्रारीनंतर एफआयआर दाखल केली आहे. कांतारा चित्रपटातील भूत कोला परंपरेबाबत अपमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप चेतनवर आहे. चेतनची प्रतिक्रिया ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे, असंही तक्रारीत म्हटलं गेलंय.

हे सुद्धा वाचा

‘कांतारा’चा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी याने एका मुलाखतीत म्हटलं की, “हिंदू संस्कृती आणि हिंदू धार्मिक परंपरेचा हा एक भाग आहे. मी स्वत: हिंदू आहे आणि मला माझ्या धर्मावर आणि त्यातील परंपरांवर विश्वास आहे. त्यावरून मी प्रश्न उपस्थित करत नाही.”

ऋषभच्या याच वक्तव्यावरून चेतनने प्रतिक्रिया दिली होती. “आमचा कन्नड चित्रपट कांतारा हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे, याचा आनंद आहे. दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने असा दावा केला की भूत कोला ही हिंदू संस्कृती आहे. हे चुकीचं आहे. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा आपल्या परंपरा या संपूर्ण सत्यतेनं दाखवल्या गेल्या पाहिजेत”, असं चेतनने ट्विट केलं होतं.

बुधवारी चेतन यांनी पत्रकार परिषद घेत भूत कोला ही आदिवासी परंपरेचा एक भाग आहे आणि याचा ब्राह्मणवादाशी काहीच संबंध नाही, असं म्हटलं. दक्षिण कन्नडमधील भूत कोला परंपरा या चित्रपटात दाखवली गेली. यामध्ये देवता आणि आत्मा यांची पशुरुपात पूजा केली जाते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.