सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद, व्हिडीओ समोर
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. गोळीबाराचा Exclusive व्हिडीओ TV9 मराठीच्या हाती लागला आहे... अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झालेला आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सलमान खान याच्या घराबाहेर ज्या दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला आहे त्यांचा व्हिडीओ TV9 मराठीच्या हाती लागला आहे. व्हिडीओमध्ये अज्ञात व्यक्ती वेगाने गाडी घेऊन वांद्रे परिसरातून जाताना दिसत आहेत. त्यांनी 4 राऊंड सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर केले आहेत. त्यातील दोन राऊंड अपार्टमेंटच्या भिंतीवर केले आहेत. सध्या याठिकाणी पोलीस पोहोचले आहेत. सलमान खान याच्या घरात देखील पोलीस विचारपूस करण्यासाठी पोहोचले आहे.
व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांनी जोर धरला आहे. गोळीबारावर अद्याप सलमान खान आणि कुटुंबाकडून कोणती प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर येत आहे…
आतापर्यंत अनेकदा सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सलमान खान याच्या चाहत्यांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत मोठी कबुली दिली होती.
सलमान खान याची हत्या का करणार होता? याचं कारण लॉरेन्स बिश्नोई याने सांगितलं होतं. त्यामुळे सलमान खान याच्या घराबाहेर झालेला गोळीबार लॉरेन्स बिश्नोई यानेच घडवून आणला आहे का? अशी देखील चर्चा सध्या जोर धरत आहे.
अभिनेत्याला धमकीचा मेल आल्यानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. बॉलिवूडच्या दबंग खान याच्याकडे व्हाय प्लस सुरक्षा आहे… गेल्या वर्षी सलमान खान याच्या ऑफिसमध्ये धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता. सलमानच्या जवळच्या प्रशांत गुंजाळकरला रोहित गर्गकडून धमकीचा मेल आला होता.