Nita Ambani वयाच्या 59 व्या वर्षातही फिट; काय आहेत त्यांचे फिटनेस सिक्रेट?
नीता अंबानी रोज व्यायाम तर करतातच, पण दिवसाची सुरुवात या पदार्थाने करतात... तुम्हाला देखील फिट राहायचं असेल तर, जाणून घ्या नीता अंबानी यांचे फिटनेस सिक्रेट
मुंबई : भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पत्नी नीता अंबानी (nita ambani) कायम चर्चेत असतात. नीता अंबानी एक रॉयल आयुष्य जगतात. त्याच्याकडे अनेक महागड्या वस्तू देखील आहेत. नीता अंबानी यांच्या वस्तू आणि वस्तूंची किंमतीची कायम चर्चा रंगत असते. कोणत्याही कार्यक्रमात नीता अंबानी यांचा रॉयल अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेतो. वयाच्या ५९ वर्षी देखील नीता अंबानी प्रचंड सुंदर आणि फिट दिसतात. कायम फिट राहण्यासाठी नीता अंबानी व्यायाम तर करतातच पण कधी कोणते पदार्थ खायचे याकडे देखील नीता अंबानी विशेष लक्ष देतात. तर जाणून घेवू नीता अंबानी यांचे फिटनेस सिक्रेट,.
ईशा, आकाश आणि अनंत यांना जन्म दिल्यानंतर नीता अंबानी यांचं वजन प्रचंड वाढलं होतं. नीता अंबानी यांनी वजन कमी करण्यासाठी नक्की काय केलं? याबद्दल आज सविस्तर जाणून घेवू. जेव्हा नीता अंबानी यांनी मुकेश अंबानी यांच्यासोबत लग्न केलं, तेव्हा त्या प्रचंड फिट होत्या. नीता आणि मुकेश अंबानी यांच्या लग्नाचे फोटो आजही व्हायरल होत असतात. (nita ambani daily routine)
जेव्हा नीता अंबानी यांचं लग्न झालं तेव्हा त्यांचं वजन फक्त ४७ किलो असल्याचं सांगितलं जातं. पण ईशा, आकाश आणि अनंत यांना जन्म दिल्यानंतर नीता अंबानी यांचं वजन प्रचंड वाढलं. पण आता नीता अंबानी प्रचंड फिट आणि सुंदर दिसतात. आता वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नीता अंबानी प्रचंड कष्ट करतात. जाणून घेवू नीता अंबानी यांच्या प्रवासाबाबत.
रिपोर्टनुसार नीता अंबानी रोज ४० मिनिटं व्यायाम करतात. नीता अंबाना योगा, जीम, स्विमिंग देखील करतात. आज देखील नीता अंबानी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत स्वतःला फिट ठेवतात. एवढंच नाही तर, नीता अंबानी यांना डान्स करायला देखील फार आवडतं. तर कधी-कधी त्या वर्कआऊट देखील करतात.
नीता अंबानी दिवसाची सुरुवात बदाम खाण्यापासून करतात. नाश्ट्यासाठी नीता अंबानी अंड्याचं सफेद आमलेट खातात. शिवाय त्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटजची मात्रा फार कमी ठेवतात. स्वतःला फिट ठेवण्यासाठी तणाव मुक्त देखील राहायलं हवं. काही जण प्रचंड खातात, त्यामागे तणाव हे कारण देखील असू शकतं.
नीता अंबानी यांच्याप्रमाणे वजण कमी करायचं असेल तर, फिटनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं असतं. शिवाय जास्त विचार, ताण, तणावामुळे देखील वजन वाढतं आणि आरोग्याला त्यामुळे हानी पोहोचते.