Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला पाच दिवस होताच सोनाक्षी सिन्हा हिने घेतला अत्यंत मोठा निर्णय, अभिनेत्रीने अखेर…

Sonakshi sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिने नुकताच झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर खास पार्टीचे आयोजनही मुंबईत करण्यात आले. या पार्टीला बॉलिवूडचे काही मोठे कलाकार हे देखील पोहचले होते.

लग्नाला पाच दिवस होताच सोनाक्षी सिन्हा हिने घेतला अत्यंत मोठा निर्णय, अभिनेत्रीने अखेर...
Sonakshi Sinha
Follow us
| Updated on: Jun 29, 2024 | 11:41 AM

शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत नुकताच लग्न केले आहे. सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबियांचा विरोध असल्याचे सातत्याने सांगितले जाते होते. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिने सही करताना वडिलांचा हात पकडल्याचे बघायला मिळाले. मात्र, लग्नामध्ये कोणत्याच विधी करताना सोनाक्षी सिन्हाचे भाऊ लव आणि कुश हे दिसले नाहीत.

सोनाक्षी सिन्हा हिने सिव्हील मॅरेज झहीर इक्बाल याच्यासोबत केले. त्यानंतर मुंबईमध्ये खास पार्टाचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पोहचले होते. विशेष म्हणजे लग्नाच्या पार्टीमध्ये धमाल करताना सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दिसले. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी खास डान्स देखील केला.

लग्न होऊन चार दिवस पूर्ण होताच लेट नाईट सोनाक्षी सिन्हा ही हॉटेलमध्ये चील मारताना दिसली. आता लग्नाला पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर आपल्या सोशल मीडियावर काही मोठे बदल हे केले आहेत.

सोनाक्षी सिन्हा हिने इंस्टाग्रामचा डीपी बदलला आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा अगोदरचा डीपी तिचा फोटो होता. आता तिने बदल करत तिचा आणि झहीर इक्बालचा फोटो ठेवला आहे. सोनाक्षी सिन्हाने झहीरसोबतचा रोमांटिक फोटो ठेवलाय. चाहत्यांना सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा हा फोटो प्रचंड आवडल्याचे बघायला मिळतंय.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शेवटी त्यांनी आता लग्न केले आहे. झहीर इक्बाल हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, म्हणावा तसा त्याला चित्रपटांमध्ये धमाका करण्यास यश मिळाले नाही. सलमान खान आणि झहीर इक्बाल याचे वडील अत्यंत चांगले मित्र आहेत, याचा खुलासा स्वत: सलमान खानने केला होता.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.