Imran Khan | रेखा, झीनत अमान, बेनझीर… इमरान खान तर पाकिस्तानचे ‘प्लेबॉय’
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचं भारतीय अभिनेत्रींसोबत अफेअरच्या चर्चा... एका मुलाखतीत म्हणाले, 'होतो मी प्लेबॉय पण...'
मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना PAK रेंजर्सने अटक केली आहे. १९९२ साली विश्वचषकावर पाकिस्तानचं नाव कोरण्यावर इमरान खान यांचा मोलाचा वाटा होता. एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून आजही त्यांची ओळख कायम आहे. पण इमरान खान त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे देखील तुफान चर्चेत होते. आजही त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतात. इमरान खान यांचं नाव अनेक भारतीय अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आलं. ८० च्या दशकात इमरान खान आणि झीनत अमान यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. शिवाय अनेक वृत्तपत्रांमध्ये देखील दोघांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी छापून आल्या.
फक्त झीनत अमान नाही तर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यासोबत देखील इमरान खान यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या… दोघे ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेत असताना एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरलं. इमरान खान यांचं पहिलं लग्न १९९५ साली जेमिमा खान यांच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
जामिमा आणि इमरान खान यांचं नातं फक्त ९ वर्ष टिकलं. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जेमिमा यांनी लग्न झाल्यानंतर इस्लाम धर्माचा स्वीकार केला. दोघांना दोन मुलं देखील आहेत. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर इमरान खान यांनी दुसरं लग्न केलं.
इमरान खान यांनी दुसरं लग्न २०१५ मध्ये पत्रकार रेहम खान यांच्यासोबत केलं. पण दोघांचं नातं फक्त १० महिने टिकलं. दुसरं लग्न देखील अपयशी ठरल्यानंतर इमरान खान यांनी तिसरं लग्न केलं. इमरान खान यांनी तिसरं लग्न बुशरा यांच्यासोबत केलं. आजही दोघांचं नातं कायम आहे. शिवाय इमरान खान यांचं अफेअर सीता व्हाइट यांच्यासोबत देखील होतं. शिवाय सीता आणि इमरान यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव टेरियन असं आहे.
एवढंच नाही तर बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्यासोबत देखील इमरान यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इमरान आणि रेखा लग्न करणार होते अशा अफवा देखील सर्वत्र पसरल्या होत्या. १९८५ साली प्रसिद्ध झालेल्या एका आर्टिकलनुसार, इमरान खान रेखा यांना भेटण्यासाठी मुंबई याठिकाणी आले होते.
मुलाखतीत इमरान खान यांचा मोठा खुलासा…
मुलाखतीत इमरान खान म्हणाले, ‘ऑगस्ट 2022 मध्ये जनरल बाजवा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मला सांगितले की त्यांच्याकडे माझ्या पक्षातील लोकांचे ऑडिओ आणि व्हिडिओ आहेत. मी ‘प्लेबॉय’ असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. मी त्याला सांगितले की होय, मी (प्लेबॉय) होतो पण भूतकाळात…’ असं देखील इमरान खान म्हणाले होते.