Nikhita Gandhi : कोण आहे निकिता गांधी? जिच्या कॉन्सर्टमध्ये इतक्या जणांनी गमावले प्राण

Nikhita Gandhi : निकीता गांधी हिच्या कॉन्सर्टसाठी जमली विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी, पण तेव्हा असं काय झालं ज्यामुळे इतक्या विद्यार्थ्यांना गमवावे लागले प्राण? बॉलिवूडसोबत आहे निकिता गांधी हिचं खास कनेक्शन

Nikhita Gandhi : कोण आहे निकिता गांधी? जिच्या कॉन्सर्टमध्ये इतक्या जणांनी गमावले प्राण
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 12:53 PM

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : नुकतात कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टमध्ये विद्यर्थांना त्यांचे प्राण गमावाले लागले असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी आहे. केरळच्या कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ओपन एअर टेक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री निकिता गांधी हिच्या कॉन्सर्टचं देखील आयोजन करण्यात आलं होत. कॉन्सर्टसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पण कॉन्सर्टने एक दोन नाही तर चार विद्यार्थ्यांचे प्राण घेतले आहेत, तर 60 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे..

गायिकेच्या कॉन्सर्टसाठी जमल्यानंतर अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्सर्ट सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांची पळापळ सुरु झाली आणि चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

धक्कादायक गोष्ट म्हणजे सुरुवातील कॉन्सर्टसुरु झाल्यानंतर दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली. पण निकिता हिचा कॉन्सर्ट सुरू होण्याआधीच घडली, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. एवढंच नाहीतर अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक देखील व्यक्त केला आहे.

गाकिया निकिता गांधी म्हणाली, ‘संध्याकाळी कोचीमध्ये जी घटना घडली त्यामुळे मी प्रचंड दुःखी आहे. कॉन्सर्टसुरु होण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. घटनेवर दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. विद्यार्थ्यांच्या कुटुंबासाठी मी प्रर्थना करते..’ सध्या निकिता हिची पोस्ट देखील तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहे निकिता गांधी?

32 वर्षीय निकिता गांधी प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. तिने आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि कन्नड या पाच भाषांमध्ये गाणी गायली आहेत. निकिता हिने ‘सचिन: ए बिलियन ड्रीम्स’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘केदारनाथ’, ‘लुका छुपी’, ‘सूर्यवंशी’ आणि ‘टाइगर 3’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत.

निकिता बंगाली – पंजाबी आहे. चेन्नई याठिकाणी निकिता गांधी हिचं शिक्षण पूर्ण झालं आहे. वयाच्या 12 व्या वर्षापासून अभिनेत्री ओडिसी नृत्य आणि हिंदुस्तानी संगीत शिकत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त निकिता गांधी हिची चर्चा रंगली आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.