एका ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ने बदललं चौघांचं आयुष्य; रंगभूमीवर ‘सुभेदार’ फेम अजय पुरकर यांचं नाटक

‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे असून गुरु ठाकूर यांनी गीतलेखनची जबाबदारी सांभाळली आहे. नेपथ्याची बाजू संदेश बेंद्रे यांची असून सूत्रधार दिगंबर प्रभू आणि व्यवस्थापक प्रशांत माणगांवकर आहेत. 'संगीत नाटक अकादमी' हा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणार्‍या कुमार सोहोनी यांनी आजवर अनेक दर्जेदार नाटकांची मेजवानी रसिकांना दिली आहे.

एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट'ने बदललं चौघांचं आयुष्य; रंगभूमीवर 'सुभेदार' फेम अजय पुरकर यांचं नाटक
अनोळखी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट'ने कसं बदललं आयुष्य? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 10:15 AM

मुंबई : 23 जानेवारी 2024 | सोशल मिडीयाच्या फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमातून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. कधी कधी आलेली एखादी अनोळखी ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ तुमचं आमचं आयुष्यही बदलू शकते. तुमचा विश्वास बसत नाही का? मग रंगभूमीवर येणारं ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक तुम्हाला पहावं लागेल. या नाटकाचं लेखन प्रसाद दाणी यांचं असून दिग्दर्शन कुमार सोहोनी यांचं आहे. अभिनेते अजय पुरकर, आकाश भडसावळे तसंच शैलेश देशपांडे, वैशाली गायकवाड हे या नाटकाचे निर्माते आहेत. ‘सवाईगंधर्व’, ‘जमदग्नीवत्स’ आणि ‘व्यास क्रिएशन्स’ या तीन संस्थांनी मिळून या नाटकाची निर्मिती केली आहे.

चौघांचं आयुष्य एका ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ने कसं बदलत जातं हे दाखवताना नात्यांचे वेगवेगळे कंगोरे आणि बंध यांचा उलगडा करणारं ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे सस्पेन्स, इमोशनल, कॉमिक अशा विविध मिश्रणाचं नाटक आहे. प्रसिद्ध अभिनेते आशिष पवार, मालिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, अभिनेते अतुल महाजन आणि बाजीप्रभू, सुभेदार या भूमिका रंगवणारे अभिनेते अजय पुरकर हे या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. या नाटकाचा शुभारंभ येत्या 25 जानेवारीला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता, तर 26 जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री 9.30 वाजता होणार आहे. 1 फेब्रुवारी दुपारी 3.30 वाजता श्री शिवाजी मंदिर, दादर येथे नाटकाचा शुभारंभ होईल.

हे सुद्धा वाचा

मोजक्याच मंडळींसोबत आजच्या पिढीचं नाटक करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे या नाटकाची निर्मिती आणि अभिनय अशा दोन्ही बाजू सांभाळल्याचं अभिनेते अजय पुरकर सांगतात. दुधारी शस्त्र असलेल्या सोशल माध्यमाचा वापर आपण कशाप्रकारे करतो? हे खूप महत्त्वाचं ठरतंय. एखादी आलेली ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकते का? याची झलक दाखवणारं हे नाटक आहे. ‘कुमार सोहोनी यांच्यासारख्या अनुभवी दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणं हा एक उत्तम अनुभव होता. उत्तम सहकलाकारांमुळे छान टीम तयार झाली असून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक रसिकांना सुरेख अनुभव देईल’ असा विश्वासही अजय पुरकर व्यक्त करतात.

या नाटकाविषयी सांगताना दिग्दर्शक कुमार सोहोनी सांगतात की, ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हा लेखक प्रसाद दाणी याचा दीर्घांक; त्याचं उत्तम नाटक होऊ शकतं हे मला जाणवलं. आजच्या पिढीचं आणि नात्याच्या बंधाचा वेगळा नाट्यानुभव देणारं हे नाटक प्रेक्षकांनाही थक्क करेल असा विश्वास ते व्यक्त करतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.