Comedian’s Networth: राजू श्रीवास्तव ते कपिल शर्मा.. जाणून घ्या या कॉमेडियन्सची संपत्ती
हिंदी चित्रपटसृष्टीत काळानुरूप खूप बदल झाले आहेत. अर्थात, एकेकाळी इंडस्ट्रीत फक्त नायक-नायिकेचंच नाव चर्चेत असायचं, पण आता विनोदी कलाकारांनीही (Comedians) आपली खास ओळख निर्माण केली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत काळानुरूप खूप बदल झाले आहेत. अर्थात, एकेकाळी इंडस्ट्रीत फक्त नायक-नायिकेचंच नाव चर्चेत असायचं, पण आता विनोदी कलाकारांनीही (Comedians) आपली खास ओळख निर्माण केली आहे. राजू श्रीवास्तव (Raju Srivastava), भारती सिंग, कपिल शर्मा यांच्यासह अनेक कॉमेडियन्सनी स्टेजवर दमदार परफॉर्म करत प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. काळानुरुप त्यांचं मानधनसुद्धा वाढलंय. काही नामांकित कॉमेडियन्सची संपत्ती (Net Worth) किती आहे, ते जाणून घेऊयात..
राजू श्रीवास्तव
राजू श्रीवास्तव हे सध्या रुग्णालयात आहेत. 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक कॉमेडी शो केले आहेत. त्यासाठी ते तगडं मानधन घ्यायचे आणि ते आता कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये आहे.
कपिल शर्मा
कपिल शर्माला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एकेकाळी तो स्टेज शो करायचा पण आता तो स्वतःचा शो चालवतो, ज्यामध्ये अनेक विनोदी कलाकार दिसतात. याशिवाय मोठमोठे बॉलिवूड कलाकारसुद्धा हजेरी लावतात. रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा एका महिन्यात सुमारे 3 कोटी रुपये कमावतो आणि त्याची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये आहे.
कृष्णा अभिषेक
कृष्णा अभिषेकचं नाव कॉमेडी विश्वात खूप लोकप्रिय आहे. तो अनेक कॉमेडी शोमध्ये दिसला आहे. त्याची कॉमेडी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. रिपोर्ट्सनुसार, कृष्णा अभिषेकची एकूण संपत्ती 22 कोटी रुपये आहे. तो महिन्याला 36 लाखांहून अधिक कमावतो.
भारती सिंग
स्टेज शो करण्यासोबतच भारती सोशल मीडियावर तिचे व्हिडिओही शेअर करत असते. रिपोर्ट्सनुसार, भारती सिंगची एकूण संपत्ती 22 कोटी रुपये आहे. ती महिन्याला 25 लाखांहून अधिक कमावते.
सुनील ग्रोव्हर
सुनील ग्रोव्हर हा देखील कॉमेडी जगतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. तो त्याच्या वेगवेगळ्या पात्रांसाठी ओळखला जातो. सुनील ग्रोव्हरकडे सुमारे 18 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो महिन्याला 25 लाखांहून अधिक कमावतो.