झोमॅटो ते बोट.. ‘शार्क टँक इंडिया’च्या परीक्षकांचा स्वत:चा व्यवसाय किती तोट्यात?

'शार्क टँक इंडिया' हा अल्पावधीत लोकप्रिय झालेला शो असून यामध्ये विविध स्टार्टअप्स आणि व्यवसायांमध्ये परीक्षक त्यांचा पैसा गुंतवतात. झोमॅटो, बोट, लेन्सकार्ट, कारदेखो, शादी डॉटकॉम यांसारख्या नामवंत कंपन्यांचे मालक या शोमध्ये परीक्षक आहेत.

झोमॅटो ते बोट.. 'शार्क टँक इंडिया'च्या परीक्षकांचा स्वत:चा व्यवसाय किती तोट्यात?
Shark Tank India Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 8:32 AM

मुंबई: 8 फेब्रुवारी 2024 | ‘शार्क टँक इंडिया’ हा अत्यंत अनोखा शो अल्पावधीतच लोकप्रिय झाला. या शोमध्ये छोटे-मोठे व्यवसाय करणारे, स्टार्ट अप्स चालवणारे गुंतवणूक मागण्यासाठी येतात आणि परीक्षक त्यात गुंतवणूक करायची की नाही हे ठरवतात. या शोमुळे अनेक छोट्या व्यवसायांना चालना मिळाली आहे. सध्या शार्क टँक इंडियाचा तिसरा सिझन सुरू आहे. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये परीक्षक कोट्यवधी रुपये विविध व्यवसायाच गुंतवतात. या परीक्षकांना व्यवसायाचं असलेलं ज्ञान आणि त्यांची गुंतवणूक रक्कम पाहून अनेकांना वाटत असेल की त्यांचा स्वत:चा व्यवसाय जोरात चालत असेल. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत हे खरं नाही. शार्क टँक इंडिया या शोमध्ये परीक्षक म्हणून हजेरी लावणारे बरेच बिझनेसमन हे स्वत: तोट्यात आहेत. ‘बोट’ या कंपनीचे अमन गुप्ता, ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची विनीता सिंह, ‘झोमॅटो’चे दीपिंदर गोयल यांसह इतर परीक्षकांच्या कंपन्यांचा महसूल किती आहे आणि ते किती तोट्यात आहेत, ते पाहुयात..

कंपनी तोट्यात असलेले ‘शार्क टँक इंडिया’चे परीक्षक-

रितेश अग्रवाल यांचा OYO तोटा- 1,287 कोटी रुपये महसूल- 5,464 कोटी रुपये

विनीता सिंगचा SUGAR कॉस्मेटिक्स तोटा- 76 कोटी रुपये महसूल- 420 कोटी

हे सुद्धा वाचा

अमन गुप्ता यांचा ‘बोट’ तोटा- 129.4 कोटी रुपये महसूल- 3,377 कोटी रुपये

दीपिंदर गोयल यांचा ‘झोमॅटो’ तोटा- 971 कोटी रुपये महसूल- 7,079 कोटी रुपये

अमित जैन यांचा ‘कार देखो’ तोटा – 562 कोटी रुपये महसूल- 2,331 कोटी रुपये

अझहर इक्बालचे ‘इनशॉर्ट्स’ तोटा- 309.75 कोटी रुपये महसूल- 180.90 कोटी रुपये

रॉनी स्क्रूवालाचं ‘अपग्रॅड’ तोटा – 1,142 कोटी रुपये महसूल – 1,194 कोटी रुपये

वरुण दुआचा ‘ACKO इन्शुअरन्स’ तोटा- 738 कोटी रुपये महसूल- 1,758 कोटी रुपये

‘शार्क टँक इंडिया’चे असे तीन परीक्षक ज्यांचा व्यवसाय नफ्यात आहे-

नमिता थापरचा ‘एमक्योअर फार्मास्युटिकल्स’ नफा – 160 कोटी रुपये महसूल – 3107 कोटी रुपये

पीयूष बन्सल यांचा ‘लेन्सकार्ट’ नफा- 260 कोटी रुपये महसूल- 3,780 कोटी रुपये

राधिका गुप्ताचा ‘एडलवाईस म्युच्युअल फंड’ नफा- 17.7 कोटी रुपये महसूल – 216 कोटी रुपये (मागील आर्थिक वर्ष 2022-23 चे आकडे)

‘शार्क टँक इंडिया’च्या आठ परीक्षकांच्या कंपन्या तोट्यात तर तीन परीक्षकांच्या कंपन्या नफ्यात आहेत. ‘शादी डॉटकॉम’चे अनुपम मित्तल यांच्या व्यवसायाचे आकडे उपलब्ध नाहीत.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...