सनी देओलची पत्नी लाइमलाइटपासून दूर का राहते? खुद्द अभिनेत्याने सांगितलं कारण

सनी देओल आणि पूजा देओल यांना करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. त्यापैकी राजवीरने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दोनों’ या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. मात्र त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. तर करणसुद्धा इंडस्ट्रीत कार्यरत आहे. मात्र त्यालाही अद्याप अपेक्षित असं यश मिळालं नाही.

सनी देओलची पत्नी लाइमलाइटपासून दूर का राहते? खुद्द अभिनेत्याने सांगितलं कारण
Sunny Deol with wife Pooja DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 1:44 PM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा बहुचर्चित चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा आठवा सिझन नुकताच सुरू झाला आहे. या नव्या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी उपस्थित होती. या दोघांनी बऱ्याच मुद्द्यांवरून करणसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर आता दुसऱ्या एपिसोडमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल ही भावंडांची जोडी उपस्थित राहणार आहे. या एपिसोडमध्ये सनी आणि बॉबी यांच्यासोबत करण अनेक विषयांबद्दल गप्पा मारणार आहे. हा नवा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधी ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या सिझनमधील एक खास व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्या एपिसोडमध्येही सनी देओलने हजेरी लावली होती. या एपिसोडमध्ये सनी देओलने बॉलिवूड पार्ट्यांपासून लांब राहण्यामागचं कारण सांगितलं होतं. त्याचसोबत पत्नीपूजा देओलसुद्धा लाइमलाइटपासून दूर का राहते, याचा खुलासा केला होता.

सनी देओलने ब्रिटिश शाही कुटुंबातील लिंडाशी केलंय. लिंडाने सनी देओलशी लग्न केल्यानंतर आपलं नाव बदलून पूजा असं ठेवलंय. आज ती पूजा देओल म्हणूनच ओळखली जाते. पत्नीविषयी सनी देओल करणसमोर म्हणाला, “आम्ही सर्वजण वैयक्तिक आयुष्यात असेच आहोत. आम्ही अशाच मित्रमैत्रिणींच्या घरी किंवा कार्यक्रमाला जाणं पसंत करतो, जिथे आम्ही आरामात वावरू शकू. आम्ही सतत कॅमेरासमोर शूटिंग करत असतो. जिथे जातो तिथे लोक आमच्याकडे एकटक पाहत असतात. त्यामुळे खासगी आयुष्यात आम्हाला अशी वेळ हवी असते, जिथे आम्हाला कोणीच पाहत नसतील. म्हणूनच मला वेळ असेल तेव्हा मी परदेशात फिरणं किंवा राहणं पसंत करतो. कारण तिथे कोणीच तुम्हाला त्रास देत नाही.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Deol (@imkarandeol)

बॉलिवूड पार्ट्यांपासून लांब राहण्यामागचं कारण सांगताना सनी पुढे म्हणाला, “मी दारू पित नाही. त्याचप्रमाणे मी सर्वांशी खुलेपणाने मिसळून वागत नाही. संपूर्ण दिवस काम केल्यानंतर किमान संध्याकाळी किंवा रात्री मला अशा ठिकाणी जायला आवडतं, जिथे मला मन:शांती मिळेल. मला सकाळी लवकर उठायची सवय आहे आणि या सर्व पार्ट्या रात्री उशिरापर्यंत चालतात.”

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.