Sunny Deol | सनी देओलला पाकिस्तानी व्यक्तीकडून धमकी; अभिनेता म्हणाला “पंगा घ्यायचा असेल तर..”

'गदर 2' या चित्रपटावरून एका पाकिस्तानी व्यक्तीने सनी देओलला धमकी दिली आहे. त्यावर सनीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे. हा व्हिडीओ खुद्द सनीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

Sunny Deol | सनी देओलला पाकिस्तानी व्यक्तीकडून धमकी; अभिनेता म्हणाला पंगा घ्यायचा असेल तर..
Sunny DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 2:03 PM

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओलने बऱ्याच वर्षांनंतर ‘गदर 2’ या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. या चित्रपटाच्या यशासोबतच सनी देओलसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याचसोबत तो विविध मुलाखतीसुद्धा देतोय. नुकताच त्याने सोशल मीडियावर आगामी एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मुलाखतीत सनी देओलने चित्रपटाविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांची मोकळेपणे उत्तरं दिली आहेत. त्याचसोबत ‘गदर 2’ या चित्रपटावर आणि सनी देओलवर आरोप करणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तीला त्याने सडेतोड उत्तर दिलं.

पाकिस्तानी व्यक्तीकडून सनी देओलला आव्हान

सनी देओलने रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात सनि देओलला अँकर म्हणतात, “तुमच्यावर पाकिस्तानातून बरेच आरोप लावण्यात आले आहेत. एकाने म्हटलंय की सनीने आधी हँड पंप उखडलं होतं तेव्हा आमच्याकडे पाणी येणं बंद झालं होतं. आता त्याने विजेचा खांबच उखडला आहे, तर आमच्याकडे वीजच नाही.” हे ऐकून सनी देओल हसतो आणि पुढे म्हणतो, “हे पहा जेव्हा तारा सिंगच्या कुटुंबावर संकट येतं, तेव्हा त्याला कोणीच थांबवू शकत नाही.” त्यानंतर एक पाकिस्तानी व्यक्ती सनी देओलला म्हणतो, “आर्मी तर दूरची गोष्ट आहे, सनीने माझ्यासमोर यावं. तेव्हा मी त्याला दाखवीन की कोणामध्ये किती दम आहे?” हे ऐकून सनी म्हणतो, “हे पहा मी एक अभिनेता आहे आणि मी परफॉर्म करतो. चित्रपटाला लोकांनी गांभीर्याने घेऊ नये. मात्र जर एखाद्याला माझ्याशी पंगा घ्यायचाच असेल तर त्याने माझ्यासमोर यावं.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

कृतज्ञतेच्या भावनेनं सनीचे डोळे पाणावले

या मुलाखतीच्या सुरुवातीला उपस्थित प्रेक्षक सनी देओलचा टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत करतात. त्यावेळी त्याचे डोळे कृतज्ञतेच्या भावनेने पाणवतात. “इतके लोक माझ्यावर खुश आहेत. मला त्यावर विश्वास बसत नाही की मी या प्रेमाच्या लायक आहे की नाही. केवळ प्रेक्षकांकडूनच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतूनही सनी देओलला प्रचंड प्रेम मिळालं. गेल्या शनिवारी ‘गदर 2’च्या टीमकडून मुंबईत मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगणपासून राजकुमार राव, सारा अली खान, क्रिती सनॉन, शिल्पा शेट्टी, कार्तिक आर्यन यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.