Gadar 2 च्या कमाईचा वेग मंदावतोय, पण सिनेमा रचतोय नवीन विक्रम; ‘ओएमजी 2’ ची स्थिती मात्र…

gadar 2 vs omg 2 box office collection | सनी देओल स्टारर 'गदर 2' सिनेमा रचतोय विक्रमावर विक्रम... सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावत असताना देखील कमाई तर थक्क करणारी... सध्या सर्वत्र सिनेमांच्या बॉक्स ऑफिसची चर्चा..

Gadar 2 च्या कमाईचा वेग मंदावतोय, पण सिनेमा रचतोय नवीन विक्रम; 'ओएमजी 2' ची स्थिती मात्र...
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 7:56 AM

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : ‘पठाण’, ‘द केरळ स्टोरी’ या दोन सिनेमांनंतर अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमा अनेक नवे विक्रम रचताना दिसत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावत असताना देखील सिनेमाने ४०० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. सध्या सर्वत्र सिनेमा आणि सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगत आहे. तर अक्षय कुमार-पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर ‘ओएमजी 2’ सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. पण ‘ओएमजी 2’ सिनेमा ‘गदर 2’ सिनेमापुढे फेल ठरला आहे.

‘गदर 2’ हा 2023 मधील दुसरा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे, तर ‘ओएमजी 2’ देखील हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. तर जाणून घेऊ ‘ओएमजी 2’ आणि ‘गदर 2’ ने प्रदर्शनानंतर 12 व्या दिवशी किती कोटींची कमाई केली आहे.

सनी देओलच्या अॅक्शन एंटरटेनर ‘गदर 2’ ने चित्रपटगृहात एक अनोखं वातावरण तयार केलं आहे. पहिल्या दिवसापासूनच सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. 12 दिवसांनंतर देखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. आजही चाहत्यांमध्ये सनी देओल यांची क्रेझ पाहायला मिळत आहे.

सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या मंगळवारी म्हणजे १२ व्या दिवशी सिनेमाने ११.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. म्हणजे सिनेमाने आतापर्यंत ४००.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी 2’ सिनेमाने १२ दिवशी फक्त ३.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने आतापर्यंत फक्त १२०.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘गदर 2’ आता अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ला मागे टाकत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे ‘गदर 2’ शाहरुख याच्या सिनेमाच्या रेकॉर्ड मोडू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘गरद 2’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. तर अक्षय कुमार याचा ‘ओएमजी 2’ सिनेमा १५० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडू शकतो… त्यामुळे यंदाच्या वर्षातील ब्लॉकबास्टर सिनेमा कोणता ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने 543 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘गदर २’ ने ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 242.20 कोटी रुपये कमावले होते. आता ‘गदर २’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.