Gadar 2 | अखेर तारा सिंगने पठाणला नमवलंच; ‘गदर 2’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या 'गदर 2' या चित्रपटाने अखेर शाहरुख खानच्या 'पठाण'चा विक्रम मोडला आहे. सनी देओलचा हा चित्रपट आता या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तर पठाण या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

| Updated on: Sep 29, 2023 | 10:46 AM
1 / 5
तब्बल 22 वर्षांनंतर सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या 'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

2 / 5
'गदर 2'ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आणि आता अखेर शाहरुख खानच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'पठाण' या चित्रपटालाही त्याने मागे टाकलं आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 524.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर 'पठाण'ने 524.53 कोटी रुपये कमावले होते.

3 / 5
सध्या 'गदर 2' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मात्र किंग खानच्या 'जवान' या चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता लवकरच तो 'गदर 2'ला मात देईल, अशी शक्यत आहे.

4 / 5
शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने आतापर्यंत 519.69 कोटी रुपये कमावले आहेत. या वीकेंडला कमाईचा हा आकडा 'गदर 2'चा विक्रम पार करू शकतो, असा अंदाज आहे. असं झाल्यास 'जवान' हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेलं.

5 / 5
'गदर 2' या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्यासोबतच उत्कर्ष शर्माचीही मुख्य भूमिका आहे. उत्कर्ष हा दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'गदर' या चित्रपटातसुद्धा त्याने सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारली होती.