Gadar 2 | अनिल शर्मा यांनी शेअर केला खास व्हिडीओ, जुन्या दिवसांची आली आठवण, सनी देओलच्या ‘गदर 2’चा जलवा

सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गदर 2 हा सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाका केला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला होता.

Gadar 2 | अनिल शर्मा यांनी शेअर केला खास व्हिडीओ, जुन्या दिवसांची आली आठवण, सनी देओलच्या 'गदर 2'चा जलवा
Gadar 2 Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 8:37 PM

मुंबई : सनी देओल याचा स्टारर गदर 2 हा चित्रपट (Movie) नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल आणि चित्रपटाची टिम दिसली. विशेष म्हणजे तब्बल 22 वर्षांनी गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मुळात म्हणजे गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी गदर 2 चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केल्याचे चित्रपटाच्या कमाईमधून स्पष्ट झाले आहे.

गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच आहे. गदर 2 चित्रपट रिलीज झाल्यानंतर सनी देओल याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना मोठे आवाहन केल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर काही चुकले असेल तर माफ करा परंतू भांडणे करत बसू नका असेही शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणताना सनी देओल हा दिसत होता.

गदर 2 चित्रपट रिलीज होऊन आज दुसरा दिवस आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळतो. नुकताच गदर 2 चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबतच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. आता अनिल शर्मा यांची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

अनिल शर्मा यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील व्हिडीओमध्ये एक थिएटर दिसत आहे आणि या थिएटरबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही गर्दी अत्यंत मोठी असून गदर 2 चित्रपट बघण्यासाठी इतकी गर्दी लोकांनी गेल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांनंतर एखाद्या चित्रपटासाठी लोकांनी इतकी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे.

ही पोस्ट शेअर करताना अनिल शर्मा यांनी म्हटले की, जुने दिवस आठवले… थिएटरसमोर असा उत्सव व्हायचा… हुकूमत, तहलका, गदर असे माझे अनेक चित्रपट…मला खरोखरच देवाचा आशीर्वाद आहे.. आता गदर 2 हा देखील तुफान घेऊन आला आहे… धन्यवाद…आता अनिल शर्मा यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.