मुंबई : सनी देओल याचा स्टारर गदर 2 हा चित्रपट (Movie) नुकताच रिलीज झालाय. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल आणि चित्रपटाची टिम दिसली. विशेष म्हणजे तब्बल 22 वर्षांनी गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मुळात म्हणजे गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी गदर 2 चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केल्याचे चित्रपटाच्या कमाईमधून स्पष्ट झाले आहे.
गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच आहे. गदर 2 चित्रपट रिलीज झाल्यानंतर सनी देओल याने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना मोठे आवाहन केल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर काही चुकले असेल तर माफ करा परंतू भांडणे करत बसू नका असेही शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणताना सनी देओल हा दिसत होता.
गदर 2 चित्रपट रिलीज होऊन आज दुसरा दिवस आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळतो. नुकताच गदर 2 चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबतच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. आता अनिल शर्मा यांची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
Purane jamane ki yaad aa gayi .. risa hi utsav hua karta tha cinema hall ke samne .. #hukumat #ekanejung #tehkka #gadar many of my films .. m truly blessed by GOD .. now #GADAR2 audiences has taken a storm thx .. pic.twitter.com/AuApMIHNAH
— Anil Sharma (@Anilsharma_dir) August 12, 2023
अनिल शर्मा यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील व्हिडीओमध्ये एक थिएटर दिसत आहे आणि या थिएटरबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे ही गर्दी अत्यंत मोठी असून गदर 2 चित्रपट बघण्यासाठी इतकी गर्दी लोकांनी गेल्याचे दिसत आहे. अनेक वर्षांनंतर एखाद्या चित्रपटासाठी लोकांनी इतकी गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे.
ही पोस्ट शेअर करताना अनिल शर्मा यांनी म्हटले की, जुने दिवस आठवले… थिएटरसमोर असा उत्सव व्हायचा… हुकूमत, तहलका, गदर असे माझे अनेक चित्रपट…मला खरोखरच देवाचा आशीर्वाद आहे.. आता गदर 2 हा देखील तुफान घेऊन आला आहे… धन्यवाद…आता अनिल शर्मा यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.