Sunny Deol | ‘पाजी को गुस्सा आया…’, सर्वांसमोर चाहत्यावर का भडकले सनी देओल? पाहा व्हिडीओ

सनी देओल चाहत्यांवर सर्वांसमोर भडकतात तेव्हा... व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी देओल यांच्या व्हिडीओची चर्चा...

Sunny Deol | 'पाजी को गुस्सा आया...', सर्वांसमोर चाहत्यावर का भडकले सनी देओल? पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 3:11 PM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : अभिनेते सनी देओल सध्या ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. आज सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर ‘गरद २’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चाहते देखील गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या प्रतीक्षेत होते. पण आता मात्र चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. सोशल मीडियावर देखील ‘गदर २’ सिनेमाचा बोलबाला आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ सिनेमाची चर्चा सुरु असताना सनी देओल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सनी देओल चाहत्यांवर भडकताना दिसत आहेत. सनी देओल यांची वागणूक पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सनी देओल नेहमीच हसताना किंवा कधी कधी भावूक असताना चाहत्यांच्या समोर येतात .पण चाहत्यांनी त्यांना पहिल्यांदाच एवढं रागवताना पाहिलं आहे. सनी यांच्या अशा वागणुकीमुळे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. व्हिडीओवर कमेंट करत चाहते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओमध्ये सनी देओल यांना विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. तेव्हा एक चाहता सनी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आला. तेव्हा सनी यांच्या बॉडीगार्ड्सने चाहत्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरी देखील चाहते अभिनेत्याजवळ पोहोचला आणि जेव्हा तो सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न करत होता, तेव्हा सनी देओल चाहत्यावर भडकले. सध्या सनी देओल यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहून चाहते कमेंट करत म्हणाले, ‘आम्ही तुमचा आदर करतो, पण लोकांसोबत तुमची वागणूक अत्यंत वाईट आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पाजी को गुस्सा आ गया…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘एरोगेन्स… अच्छा…’ व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी सनी देओल यांना ट्रोल करत आहेत.

सनी देओल याच्या गदर २ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल चाहत्यांच्या भेटीस आला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ११ ऑगस्ट रोजी सनी देओल यांच्या ‘गदर २’ सिनेमासोबत, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे.

दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.