Gadar 2 | सनी देओलचा ‘गदर 2’ ओटीटीवर पहायचंय? जाणून घ्या कधी, कुठे प्रदर्शित होणार चित्रपट?

गदर 2 हा चित्रपट जवळपास 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचा 400 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, असा विश्वास निर्मात्यांना आहे.

Gadar 2 | सनी देओलचा 'गदर 2' ओटीटीवर पहायचंय? जाणून घ्या कधी, कुठे प्रदर्शित होणार चित्रपट?
Gadar 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 2:58 PM

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने तब्बल 375 कोटी रुपयांची कमाई केली. केवळ वीकेंडलाच नाही तर इतर दिवसांतही प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. यादरम्यान चाहते ‘गदर 2’च्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करतायत. थिएटरमधून चित्रपट बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो. मात्र ‘गदर 2’च्या ओटीटी रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाचं ओटीटी प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. कारण हा चित्रपट अद्याप थिएटरमध्ये चांगली कामगिरी करतोय. म्हणूनच निर्मात्यांनी लगेचच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘गदर 2’ला इतक्यात तरी ओटीटीवर किंवा कोणत्याही टीव्ही चॅनलवर ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर’ म्हणून प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा कोणताच प्लॅन नाही. यासाठी निर्माते दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करणार आहेत. म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2’ ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकेंडला रविवारी 38.09 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

कोरोना महामारीनंतर थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट सर्वसाधारणपणे चार किंवा आठ आठवड्यांनंतर ओटीटीवर रिलीज केले जातात. मात्र ‘गदर 2’च्या ओटीटी रिलीजसाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटाचे निर्माते शारिक पटेल यांना जेव्हा ओटीटी रिलीजविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले, “यासाठी कमीत कमी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल. आम्ही अद्याप ओटीटी रिलीजबाबतचा कोणताच निर्णय घेतला नाही.”

हे सुद्धा वाचा

‘गदर 2’ या चित्रपटाचे डिजिटल आणि सॅटेलाइट राइट्स ‘झी’कडे आहेत. तेच या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. त्यामुळे हा चित्रपट ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. तर याच प्लॅटफॉर्मवर ‘गदर : एक प्रेम कथा’ हा 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला पहिला भागसुद्धा 4K क्वालिटीमध्ये प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.

गदर 2 हा चित्रपट जवळपास 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचा 400 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो, असा विश्वास निर्मात्यांना आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने 540.51 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे सनी देओलचा हा चित्रपट शाहरुखचा रेकॉर्ड मोडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....