Gadar 2 Public Review | सनी देओलच्या ‘गदर 2’ने चाहत्यांना केलं निराश; नेटकरी म्हणाले ‘डोकं दुखू लागलं..’
'गदर 2'ची माऊथ पब्लिसिटी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत त्याची कमाई चांगली होऊ शकते. शिवाय ॲडव्हान्स बुकिंगचाही त्याला फायदा मिळू शकतो. मात्र सोशल मीडियावरील नकारात्मक रिव्ह्यू वाढत गेल्यास हा चित्रपट फारशी कमाई करू शकणार नाही.
मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : जवळपास 22 वर्षांपूर्वी ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. तारा सिंग आणि सकिना यांची क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तब्बल 22 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिनाची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र आली आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शुक्रवारी सकाळपासून ट्विटरवर त्यावरून चर्चा सुरू आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांच्या मते हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊयात..
सुरुवातीला येत असलेल्या प्रतिक्रिया पाहता सनी देओलच्या या सीक्वेलने प्रेक्षकांची निराशा केल्याचं समजतंय. प्रसिद्ध चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘गदर 2’ला पाचपैकी फक्त दीड स्टार दिले आहेत. त्यांनी या चित्रपटाला सहन करण्याच्या पलीकडचं असल्याचं म्हटलंय. त्यांनी दिग्दर्शन आणि परफॉर्मन्ससुद्धा वाईट असल्याचं लिहिलं आहे. विशेषकरून मध्यांतरानंतरचा भाग रटाळवाणं असल्याचं सांगितलं गेलंय.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
‘गदर 2’ हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘हा चित्रपट म्हणजे केवळ एक सर्कस वाटला. मैं निकला गड्डी लेके या गाण्याशिवाय बाकी काहीच चांगलं वाटलं नाही. याची पटकथा थर्ड क्लास भोजपुरी चित्रपटासारखी आहे. ‘गदर 2′ म्हणजे डोकेदुखी आहे’, असं एकाने लिहिलं आहे. तर अनेकांना हा चित्रपट 90 च्या दशकातला वाटला. सनी देओलला त्यात कमी स्क्रीन स्पेस मिळाली असून उत्कर्ष शर्माला लाँच करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेल्याचं म्हटलं गेलंय.
Just Finish Watching #Gadar2 . A film that looks like a film less circus more , मे निकला गाने के अलावा कुछ भी अच्छा नहीं है कहानी संवाद पटकथा सब 3rd क्लास भोजपुरी जैसी हैं गदर एक सर दर्द है Honest Review :- ⭐ #Gadar2Review pic.twitter.com/2bRq8x3Q5P
— Atul Singh Shanu 🔥 (@Mafiya_Singh11) August 11, 2023
• Just Watched #Gadar2 Morning Show
One Word Review : C-R-A-P
No Story , No Acting, Worst Direction, Makers Just tried to copy paste 2001 movie and Failed Badly. THIS HAS TO BE THE WORST MOVIE EVER I’VE WATCHED IN CINEMA. UTTERLY BULLSHIIT ….
Rating : 0.5/5 #Gadar2Review
— HYPNOtist 🔗 (@Ex_Insaan) August 11, 2023
‘गदर 2’ची माऊथ पब्लिसिटी मोठ्या प्रमाणावर झाली आहे, त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत त्याची कमाई चांगली होऊ शकते. शिवाय ॲडव्हान्स बुकिंगचाही त्याला फायदा मिळू शकतो. मात्र सोशल मीडियावरील नकारात्मक रिव्ह्यू वाढत गेल्यास हा चित्रपट फारशी कमाई करू शकणार नाही. दुसरीकडे प्रेक्षकांसमोर अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ या चित्रपटाचाही पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे जर त्याचे रिव्ह्यू सकारात्मक आल्यास, ‘गदर 2’ला मोठा फटका बसू शकतो.