‘गदर’ सिनेमाच्या यशानंतर ‘गदर २’ ची पहिली झलक समोर; चाहत्यांचा उत्साह शिगेला

gadar 2 release date 2022 new look viral on social media

'गदर' सिनेमाच्या यशानंतर 'गदर २' ची पहिली झलक समोर; चाहत्यांचा उत्साह शिगेला
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 5:11 PM

मुंबई : अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर’ सिनेमाने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. आजही सिनेमाचे डायलॉग आणि गाणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. आजही ‘गदर’ सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. दरम्यान प्रेक्षक ‘गरद २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर सिनेमाच्या यशानंतर ‘गदर २’ सिनेमाच्या चर्चा आता रंगत आहेत. दिग्दर्शक अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गरद २’ सिनेमाची पहिली झलक चाहत्यांच्या भेटीस आली आहे.

‘गदर’ सिनेमाच्या यशानंतर २०२२ मध्ये सिनेमाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली. घोषणेनंतरच प्रेक्षकांची सिनेमाप्रती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमात सनी देओलचे अनेक वेगळे अंदाज चाहत्यांच्या भेटीस आले. अनेक ऍक्शन सीनने चाहत्यांच्या मनात घर केलं.

अभिनेत्याचा अभिनय पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी सनीसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. आता ‘गरद’ सिनेमाचा सिक्वल ‘गरद २’ तुफान चर्चेत आहे. दरम्यान ‘झी स्टूडीओ’कडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये यंदाच्या वर्षात प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक सिनेमाची एक झलक दाखवण्यात आली आहे.

‘झी स्टूडीओ’कडून पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अजय देवगन स्टारर ‘मैदान’, सोनू सूद स्टारर ‘फतेह’ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर ‘हड्डी’ सिनेमाची एक झलक दाखवण्यात आली आहे. शिवाय ‘गदर २’ सिनेमाच्या एका सीनने चाहत्यांचं लक्ष केंद्रीत केलं आहे.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमात सनीने हँडपंप उचलला होता. आता ‘गदर २’ सिनेमामध्ये अभिनेता बैलगाडीचं चाक उचलताना दिसणार आहे. सध्या ‘गदर २’ सिनेमाची एक झलक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.