Gadar | ‘गदर’मधील 21 कलाकारांपैकी चौघांनी घेतला जगाचा निरोप; बाकी 17 कलाकार आता दिसतात असे

गदर : एक प्रेम कथा या चित्रपटाची कथा भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट ब्रिटिश सैन्यात माजी सैनिक असलेल्या बूटा सिंगवर आधारित असल्याचं म्हटलं जातं.

Gadar | 'गदर'मधील 21 कलाकारांपैकी चौघांनी घेतला जगाचा निरोप; बाकी 17 कलाकार आता दिसतात असे
गदर : एक प्रेम कथाImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 10:58 AM

मुंबई : तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 11 ऑगस्ट रोजी ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सनी देओल आणि अमीषा पटेल एकत्र आले आहेत. तारा सिंग आणि सकिनाच्या प्रेमकहाणीचा पुढचा टप्पा या सीक्वेलमध्ये पहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘गदर 2’चा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याचा प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. या सीक्वेलमधील बरेच कलाकार हे पहिल्या भागातील आहेत. तर सीक्वेल प्रदर्शित होण्याआधीच काही कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. यामध्ये अभिनेते अमरिश पुरी यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. कारण पहिल्या भागात त्यांनी साकारलेली अशरफ अलीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

चार कलाकारांचं निधन

‘गदर : एक प्रेम कथा’मध्ये सनी देओल म्हणजेच तारा सिंगचा मित्र दरमियान सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक शाक्य आता या जगात नाही. तर इदरीसची भूमिका साकारलेले मिथिलेश यांनी वर्षभरापूर्वी या जगाचा निरोप घेतला. चित्रपटात तारा सिंगच्या वडिलांची भूमिका साकारणारे मास्टर सिंग यांचंही निधन झालं आहे. 2015 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपटात सकिनाच्या वडिलांची भूमिका साकारणारे अमरिश पुरीसुद्धा आज आपल्यात नाहीत.

हे सुद्धा वाचा

‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटात सनी देओलने तारा सिंग आणि अमीषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली होती. गदर वन ते गदर 2 पर्यंत दोन दशकं पूर्ण झाली असली तरी आतासुद्धा हे कलाकार तितकेच फिट आणि आकर्षक वाटतात. गदर वनमध्ये तारा सिंगचा मुलगा चरणजीतची भूमिका साकारणारा उत्कर्ष शर्मा आता फार हँडसम झाला आहे. तर सकिनाच्या अम्मीची भूमिका साकारणाऱ्या लिलिट दुबे आजही तितक्याच फिट आहेत. याशिवाय इशरत अली, विश्वजीत प्रधान, मुश्ताक खान, डॉली बिंद्रा, अभय भार्गव, श्वेता शिंदे, कनिका शिवपुरी, मालविका शिवपुरी, मधुमालती कपूर, अमिता खोपाकर, टॉनी मीरचंदानी, समर जय सिंह, प्रतीमा खन्ना यांच्या लूकमध्ये थोडाफार बदल नक्कीच झाला आहे.

गदर : एक प्रेम कथा या चित्रपटाची कथा भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट ब्रिटिश सैन्यात माजी सैनिक असलेल्या बूटा सिंगवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. फाळणीच्या वेळी झालेल्या जातीय दंगलीत त्यांनी वाचवलेल्या झैनब या मुस्लिम मुलीसोबतच्या त्यांच्या प्रेमकथेवर चित्रपटाची कथा आधारित असल्याचं म्हटलं गेलंय.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.