Vivek Shauq | वजन कमी करण्याची जिद्द पडली महागात; ‘गदर’ फेम अभिनेत्याने गमावला होता जीव

विवेक यांना मोठ्या पडद्यावर स्लिम आणि फिट दिसायचं होतं. त्यासाठी त्यांनी बरीच मेहनतसुद्धा घेतली होती. वजन कमी करण्यासाठी 3 जानेवारी 2011 रोजी त्यांच्यावर लिपोसक्शन सर्जरी झाली होती. मात्र सर्जरीच्या दोन तासांनंतर त्यांची प्रकृती बिघडली.

Vivek Shauq | वजन कमी करण्याची जिद्द पडली महागात; 'गदर' फेम अभिनेत्याने गमावला होता जीव
विवेक शौकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 11:25 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी मुख्य नव्हे तर सहअभिनेता किंवा सहअभिनेत्रीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. यात विनोदी कलाकार मोठ्या प्रमाणावर आहेत. ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटात सनी देओलच्या मित्राची भूमिका साकारणारे अभिनेते विवेक शौक यांचा आज जन्मदिन आहे. विवेक शौक यांचा जन्म 21 जून 1963 रोजी पंजाबमधील चंदीगडमध्ये झाला होता. ‘गदर’मध्ये तारा सिंग म्हणजेच सनी देओलचा मित्र बनलेले विवेक हे प्रसिद्ध लेखक आणि गायकसुद्धा होते.

विवेक शौक यांचं करिअर

विवेक जेव्हा 17 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या आईनेही जगाचा निरोप घेतला. विवेक यांनी अभिनयातील करिअरची सुरुवात थिएटर आणि मालिकांमधून केली होती. सर्वांत आधी ते जसपाल भट्टी यांच्यासोबत दूरदर्शनवर ‘उल्टा पुल्टा’ आणि ‘फ्लॉप शो’मध्ये झळकले होते. त्यानंतर त्यांनी पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

‘गदर’मधील भूमिकेमुळे लोकप्रियता

विवेक यांनी 1998 मध्ये ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी सनी देओलच्या मित्राची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी दिल्ली हाइट्स, ऐतराज, 36 चायना टाऊन, हम को दिवाना कर गए, दिल है तुम्हाला, मिनी पंजाब आणि नालायक यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

एका चुकीने घेतला जीव

विवेक यांना मोठ्या पडद्यावर स्लिम आणि फिट दिसायचं होतं. त्यासाठी त्यांनी बरीच मेहनतसुद्धा घेतली होती. वजन कमी करण्यासाठी 3 जानेवारी 2011 रोजी त्यांच्यावर लिपोसक्शन सर्जरी झाली होती. मात्र सर्जरीच्या दोन तासांनंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते कोमात होते. सर्जरीच्या सात दिवसांत 10 जानेवारी 2011 रोजी त्यांचं निधन झालं. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....