Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठची तब्येत पुन्हा बिघडली, अश्लील व्हिडीओ प्रकरणी अद्याप तुरुंगात!

गहना सध्या भायखळा कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच तुरुंगात तिची तब्येत पुन्हा ढासळली आहे. या दरम्यान तिला रुग्णालयातही नेण्यात आले आहे. वृत्तानुसार, गहनाला शुक्रवार आणि शनिवारी तुरूंगातून बाहेर नेण्यात आले होते.

‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठची तब्येत पुन्हा बिघडली, अश्लील व्हिडीओ प्रकरणी अद्याप तुरुंगात!
गहना वशिष्ठ
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 3:44 PM

मुंबई : ‘गंदी बात’ फेम टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई क्राइम ब्रँचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलने रविवारी अटक केली होती. अडल्ट व्हिडीओ शूटिंग शेअर केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. गहना सध्या भायखळा कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच तुरुंगात तिची तब्येत पुन्हा ढासळली आहे. या दरम्यान तिला रुग्णालयातही नेण्यात आले आहे. वृत्तानुसार, गहनाला शुक्रवार आणि शनिवारी तुरूंगातून बाहेर नेण्यात आले होते. तिची तब्येत खूपच बिघडली आहे. काही दिवसांपूर्वी तुरुंगात असलेल्या गहानाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता (Gandii baat fame actress gehana vasisth fall sick in byculla jail).

अभिनेत्री गहना वशिष्ठ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच, तिची चौकशी करणार्‍या गुन्हे शाखेच्या 6 अधिकाऱ्यांना देखील अलगीकरणात ठेवण्यात आले होते. अश्लील व्हिडीओ शूटिंग आणि अपलोड करण्यासाठी ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक करण्यात आली होती.

कोण आहे गहना वशिष्ठ?

‘गंदी बात’ या वेब सीरीजमुळे गहना वशिष्ठ प्रकाशझोतात आली होती. गहनाने आतापर्यंत आपली खरी ओळख लपवून ठेवली होती. तिचे खरे नाव वंदना तिवारी असे आहे. वंदना ही मूळची छत्तीसगढची असून तिचे वडील शिक्षण विभागात अधिकारी आहेत. ‘गंदी बात’ या वेब सीरीजमुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. त्यामुळे गहनाच्या अटकेने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

मिस आशिया बिकिनीचा ताज जिंकणाऱ्या गहना हिने हिंदी, तेलगू सिनेमांमध्ये आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गहनाने 87 अश्लील व्हीडिओ आणि पॉर्न व्हीडिओ शूट केले आहेत आणि ते तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. या चॅनेलची सदस्यता घेतलेल्या लोकांना 2 हजार रुपये हे व्हीडिओ पाहण्यासाठी द्यावे लागतात (Gandii baat fame actress gehana vasisth fall sick in byculla jail).

पोलिसांनी केली अटक

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मड बेटावर काही खासगी बंगल्यांमध्ये वेश्या व्यवसाय आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ शूट होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मोठ्या हुशारीने पोलिसांनी या बंगल्यांवर छापे टाकले. काही टोळ्या तरुण मुलींना चित्रपटात मोठं काम देतो, असं सांगून अश्लील व्हिडीओंमध्ये काम करून घेत होत्या. या रॅकेटमधून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली, ज्यांना नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या छाप्यात पोलिसांनी यासमीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती.

लॉकडाऊनमध्येही रॅकेट सुरु

लॉकडाऊनच्या काळातही या पॉर्न रॅकेटचे काम जोरात सुरु होते. याच काळात अनेक अश्लिल चित्रपटांची शुटिंग करण्यात आल्याची माहिती आहे. या रॅकेटच्या माध्यमातून एस्कॉर्ट सर्व्हिस किंवा वेश्या व्यवसायही केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापैकी काही मॉडेल्स आणि अन्य लोकांचा बॉलीवूडशी संबंध असल्याचेही समजते.

(Gandii baat fame actress gehana vasisth fall sick in byculla jail)

हेही वाचा :

Sachin Pilgaonkar | ‘महागुरूं’नी घेतली कोरोनाची लस, सोशल मीडियावर फोटो शेअर करत मानले डॉक्टरांचे आभार!

'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.