मुंबई : 19 सप्टेंबर 2023 | एक वर्ष भक्त आजच्या दिवसाची प्रतीक्षा करत असतात. आजचा दिवस गणेश भक्तांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा आहे. कारण गणराज आज अनेकांच्या घरी विराजमान होणार आहे. फक्त सर्व सामान्य नाही तर, सेलिब्रिटी देखील गणरायाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. संपूर्ण देखील आनंदाचं वातावरण आहे. आज देशभरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जात आहे. पुढचे १० दिवस सर्वत्र भक्तीमय वातारण असणार आहे. अनेकांच्या घरात आता गणरायाचं आगमन झालं आहे. बॉलिवूड स्टार्सनी बाप्पाला घरोघरी आणण्यास सुरुवात केली आहे. नुकताच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मोठ्या थाटामाटात बाप्पाचं घरी स्वागत केलं. शिल्पा शेट्टी हिच्यासोबतच अन्य सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री बाप्पाला घरी आणताना दिसत आहे. घरात जाण्यापूर्वी अभिनेत्रीने नारळ फोडला आणि त्यानंतर बाप्पाने घरात प्रवेश केला. यावेळी अभिनेत्रीसोबत तिचा पती राज कुंद्राही दिसला. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळीही राज याने स्वतःचा चेहरा लपवला होता.
अभिनेता राम चरण | राम चरण याच्या लेकीचा पहिला सण असल्यामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राम चरण याने गणेश चतुर्थी साजरी करत काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने चाहत्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘आमच्या लाडक्या क्लिन कारासह आम्ही पहिला सण साजरा करत आहोत.’ असं लिहिलं आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन | अभिनेता अल्लू अर्जुन याच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर बाप्पाचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्याने आपल्या मंदिराची झलक दाखवली आहे. ज्यामध्ये बाप्पाची अतिशय सुंदर मूर्ती बसवली आहे.
As we welcome Lord Ganesha into our hearts and homes, I wish you all a happy Ganesh Chaturthi filled with love, harmony, and new beginnings. #HappyVinayakaChavithi pic.twitter.com/KUyiwyORTv
— Sudheer Babu (@isudheerbabu) September 18, 2023
सुधीर बाबू | अभिनेता सुधीर बाबू यानेही बाप्पाचं घरी स्वागत केलं आहे. अभिनेत्याने त्याच्या मंदिराची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ज्यामध्ये बाप्पाच्या मूर्तीची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.