‘एक खून माफ असेल तर कोणाला मारशील?’, प्रसिद्ध अभिनेत्याच्या उत्तरानंतर सर्वत्र खळबळ

वडिलांच्या निधनानंतर अभिनेता अडकला होता वादाच्या भोवऱ्यात... आता 'एक खून माफ असेल तर कोणाला मारशील?' प्रश्नावर अभिनेत्यानं खळबळजनक उत्तर... सध्या सर्वत्र अभिनेत्याने दिलेल्या उत्तराची चर्चा

'एक खून माफ असेल तर कोणाला मारशील?',  प्रसिद्ध अभिनेत्याच्या उत्तरानंतर सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 1:28 PM

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’, ‘विशू’, ‘डोंगरी का राजा’ असे अनेक सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता गश्मीर महाजनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गश्मीर यांच्या चाहत्यांची संध्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे अभिनेता चर्चेत आला आहे ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं. गश्मीर याने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. सध्या सर्वत्र गश्मीर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या प्रश्न – उत्तरांच्या खेळाची चर्चा रंगत आहे.

एका चाहत्याने गश्मीरला विचारलं, ‘तुमच्या आई – वडिलांचं लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज? मधू मॅडमसारख्या सारख्या एवढ्या छान व्यक्ती रवींद्र सरांच्या आयुष्यात कशा आल्या याबद्दल जाणून घ्यायला आवडेल..’, चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘दोघांचं लव्ह मॅरेज होतं. पण दुर्दैवाने अगदी मनापासून प्रेम फक्त तिनेच केलं.’ सध्या सर्वत्र अभिनेत्याने दिलेल्या उत्तरांची चर्चा रंगत आहेत.

तर दुसऱ्या चाहत्याने गश्मीर याला, ‘एक खून माफ असेल तर कोणाला मारशील…’ या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘कोणाला मारणार नाही… फक्त चांगले कर्म करेल… यश हाच सर्वात चांगला सूड…’ यावेळी गश्मीर याने अनेक चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्वत्र शोककळा पसरली. रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त होती.

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर पुण्यात रवींद्र महाजनी एकटे का राहत होते, त्यांची काळजी कोणी का घेतली नाही… असे अनेक प्रश्न विचारत लोकांनी महाजनी कुटुंबावर निशाणा साधला.. याचं देखील स्पष्टीकरण अभिनेत्याने दिलं होतं.

Non Stop LIVE Update
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.