Gashmeer Mahajani | “कर्ज झाल्यावर ते घर सोडून गेले अन् आम्ही..”; संघर्षाबद्दल पहिल्यांदाच गश्मीर व्यक्त

वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीर पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, त्याने त्याचा संघर्ष उलगडून सांगितला. दहावीनंतरच त्याने कामाला सुरुवात केली आणि जवळपास सहा वर्षांपर्यंत त्याने कर्ज फेडलं.

Gashmeer Mahajani | कर्ज झाल्यावर ते घर सोडून गेले अन् आम्ही..; संघर्षाबद्दल पहिल्यांदाच गश्मीर व्यक्त
Ravindra and Gashmeer MahajaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 7:25 PM

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अभिनेता गश्मीर महाजनीने वयाच्या पंधराव्या वर्षापासून कुटुंबाची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली होती. बँकेचं कर्ज झाल्यानंतर वडील रवींद्र महाजनी हे घर सोडून निघून गेले आणि त्यानंतर गश्मीरने सर्व कर्ज फेडलं. त्या संघर्षाच्या काळाबद्दल तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला. या मुलाखतीत त्याने रवींद्र महाजनी यांच्या निधनामागचं कारणसुद्धा सांगितलं. जुलै महिन्यात तळेगाव इथल्या एका सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले होते. कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी गश्मीरला दिली.

“आम्ही बँकेत जाऊन त्यांच्या हातापाय पडून सांगितलं…”

‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गश्मीरने सांगितलं, “मी दहावीत होतो. त्यावेळी कर्ज झाल्यानंतर त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला. नंतर बँकेची लोकं कर्जाच्या परतफेडीसाठी आमच्या मागे लागली. मी अवघा 15 वर्षांचा होतो आणि मला त्यांची भीती वाटायची. अचानक आठ-दहा आडदांड माणसं येऊन घर सील करणार वगैरे म्हणायचे. आम्ही बँकेत जाऊन त्यांच्या हातापाय पडून सांगितलं, की जरी बाबा नसले तरी आम्ही कर्ज फेडू. तुम्ही घर सील करू नका. मग त्यांनी आमच्याकडून लिखित स्वरुपात आश्वासन घेतलं. त्यावेळी आम्ही रात्री रस्त्यावर पोस्टर लावायला जायचो. मी 15-16 वर्षांचा असल्याने पोलिसांनी मला पकडू नये म्हणून आई आमची एक जुनी गाडी होती, ती घेऊन यायची. तिथून सुरूवात केली आणि हळूहळू इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करू लागलो. सोबत डान्स अकॅडमीसुद्धा होती. कॉर्पोरेट इव्हेंट्समधून जे काही मला पैसे मिळायचे त्यातून मी संपूर्ण कर्ज फेडलं. वयाच्या 21 वर्षी ते संपूर्ण कर्ज फेडण्यात मला यश आलं. त्या सहा वर्षांत जे काही पैसे घरात आले, ते सर्व उचलून आम्ही बँकेला द्यायचो.”

“..तर त्यांच्या आत्म्यालाच हे मंजूर होणार नाही”

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरवर सोशल मीडियाद्वारे बरीच टीका झाली होती. त्याविषयी तो पुढे म्हणाला, “आता जे लोक असं म्हणतात की, एवढ्या मोठ्या घरात राहतोस. बापामुळे तू एवढं कमावलंस. त्यांना मी सांगू इच्छितो की, मी हे सगळं खूप मेहनत करून कमावलं आहे. मी कुठून आलोय, हे मला माहीत आहे. रवींद्र महाजनी हे हलाखीच्या परिस्थितीत गेले, असं कोणी आज लिहित असेल तर त्यांच्या आत्म्यालाच हे मंजूर होणार नाही. त्यांना असं बोललेलं अजिबात आवडायचं नाही.”

हे सुद्धा वाचा

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.