वडिलांच्या निधनानंतर केस का कापले नाहीत? विचारणाऱ्याला गश्मीर महाजनीचं सडेतोड उत्तर, म्हणाला ‘त्यांची जबाबदारी..’

अभिनेता गश्मीर महाजनीने आस्क मी एनिथिंग या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका युजरने त्याला वडिलांच्या निधनानंतर टक्कल का केलं नाही, याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर गश्मीरने काय उत्तर दिलं, ते जाणून घेऊयात..

वडिलांच्या निधनानंतर केस का कापले नाहीत? विचारणाऱ्याला गश्मीर महाजनीचं सडेतोड उत्तर, म्हणाला 'त्यांची जबाबदारी..'
रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 9:27 AM

मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं जुलै महिन्यात कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. तळेगाव इथल्या एका सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले होते. ते मुलगा गश्मीर महाजनीसोबत किंवा कुटुंबीयांसोबत ते का राहत नव्हते, असा प्रश्न त्यांच्या निधनानंतर अनेकांना पडला. गश्मीरने वडिलांबाबतच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दिली. त्याचप्रमाणे इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे गश्मीर सतत चाहत्यांच्या संपर्कात आहे. या सेशनदरम्यानही काही नेटकऱ्यांनी त्याला वडिलांबद्दल प्रश्न विचारले. एका युजरने गश्मीरला वडिलांच्या निधनानंतर केस का कापले नाहीत, असा सवाल केला. त्यावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

वडिलांच्या निधनानंतर टक्कल का केलं नाही?

वडील वारले की केस कापतात यावर काय बोलाल? मला तुमचा दृष्टीकोन ऐकायला आवडेल, असा प्रश्न एका युजरने केला. त्यावर गश्मीरने लिहिलं, ‘मी जे कार्य करतो त्यावर माझ्या कुटुंबाचं अर्थार्जन होतं. टक्कल केलं असतं तर हातातून कामं गेली असती. जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांची जबाबदारी तुम्ही घेतली असती का?’ वयाच्या पंधराव्या वर्षापासून गश्मीरने कुटुंबाची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली होती. बँकेचं कर्ज झाल्यानंतर वडील रवींद्र महाजनी हे घर सोडून निघून गेले आणि त्यानंतर गश्मीरने सर्व कर्ज फेडलं. त्या संघर्षाच्या काळाबद्दल तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला होता.

हे सुद्धा वाचा

रवींद्र महाजनी यांचा कुटुंबीयांशी संपर्कच नव्हता

“मी 15 वर्षांचा असतानाच ते आमच्यापासून वेगळे झाले. गेल्या तीन वर्षांपासून ते फारच एकटे राहू लागले होते. मला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा जन्माच्या वेळीच त्यांनी नातवाचा चेहरा पाहिला होता. त्यानंतर ते पुन्हा निघून गेले आणि परत आलेच नाहीत. मी अधूनमधून त्यांना नातवाचे फोटो आणि व्हिडीओ पाठवायचो. एक-दोनदा त्यांनी ते पाहिलं आणि नंतर माझा नंबर ब्लॉक केला. ही तीन-साडेतीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. यात मी कोणालाच दोष देत नाही. पण त्यांची बाजू काय असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कदाचित नातवाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून ते हळवे होऊ लागले होते. त्यामुळे पुन्हा त्यांना कुटुंबात अडकायचं नव्हतं. म्हणून त्यांनी आमचे नंबर ब्लॉक केले असावेत”, असं त्याने या मुलाखतीत सांगितलं होतं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.