अभिनेत्रीला अचानक सुरु झाल्या प्रसुती वेदना; स्वतः ड्राईव्ह करत रुग्णालयात पोहोचली आणि…
प्रसुती वेदना सुरु झाल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री स्वतः ड्राईव्ह करत रुग्णालयात पोहोचली त्यानंतर मात्र..., वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म...
मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या डिलिव्हरीच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. एवढंच नाही तर, अनेक अभिनेत्रींनी फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीने बाळाला जन्म देण्याआधी आलेल्या प्रसंगाचा खुलासा केला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गौहर खान आहे. गौहर खान हिने वयाच्या ४० व्या वर्षी गोंडस मुलाला जन्म दिला. आता अभिनेत्री मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौहर खान हिची चर्चा रंगत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच गौहर खान हिने तिच्या प्रसूती दिवसाचा अनुभव शेअर केला. अभिनेत्री म्हणाली, ‘ डॉक्टरांची अपॉईंटमेंट होती. मी रुग्णालयात जात होती. तेव्हा मी स्वतः ड्राईव्ह करत होते. तेव्हाच मला प्रसुती वेदना सुरु झाल्या. तेव्हा माझ्या सोबत पती जैद देखील होता. तो माझ्या बाजूच्या सीटवर पोहोचला होता… पण पूर्ण रुग्णालयापर्यंत मी गाडी चालवली…’
गौहर खान हिला ड्राईव्ह करायला प्रचंड आवडतं. पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला ड्राईव्ह करायला प्रचंड आवडतं. पूर्ण प्रग्नेंसीमध्ये मी गाडी चावली. पण जैद कायम माझ्या बाजूला असायचा.. डिलिव्हरीच्या दिवशी देखील मी स्वतःगाडी चालवत रुग्णालयात पोहोचली..’ सध्या सर्वत्र गौहर खान हिची चर्चा रंगली आहे.
प्रेग्नेंसी दरम्यान, प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर अभिनेत्री ४.३० वाजता रुग्नालयात पोहोचली. त्यानंतर ९.३० वाजता अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला. चार महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला. सध्या गौहर मुलगा झिहान याच्यासोबत वेळ व्यतीत करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
डिलिव्हरीनंतर अभिनेत्रीने कमी केलं १० किलो वजन
गौहर खानने प्रसूतीनंतर १० दिवसांत १० किलो वजन कमी केलं. अभिनेत्री कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून वजन कमी करण्याच्या टिप्स देते. गौहर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.