‘अबाया परिधान केल्याने कोणी मुस्लीम होत नाही’, गौहरकडून राखी सावंतविरोधात कारवाईची मागणी
अभिनेत्री राखी सावंतचा नवीन ड्रामा पाहून 'बिग बॉस' फेम गौहर खान भडकली आहे. इस्लाम धर्माची खिल्ली उडवल्याने तिच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गौहरने केली आहे.
मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे तिचा पूर्व पती आदिख खान दुर्रानी तिच्यावर विविध आरोप करत आहे. तर दुसरीकडे या सर्व वादादरम्यान राखी स्वत:ला मुस्लीम असल्याचं म्हणतेय. नुकतीच ती उमराह करण्यासाठी मक्काला पोहोचली होती. तिथून परतल्यानंतर ती आता अबाया परिधान घालून फिरताना दिसतेय. पापाराझींसमोर राखीचा नवीन ड्रामा पहायला मिळतोय. यावरून ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गौहर खान चांगलीच भडकली आहे. राखीने इस्लाम धर्माचा अपमान केल्याचा आरोप तिने केला आहे. “राखी तिच्या स्वत:च्या स्टंटसाठी उमराहचा किंवा एखाद्या धर्माचा वापर कसा करू शकते”, असा सवाल गौहरने केला.
राखीवर भडकली गौहर खान
नुकतंच गौहर खानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. कतारमधल्या एका चॅरिटीने कशा पद्धतीने 20 अनाथ मुलांना उमराह करण्यासाठी पाठवलं, असं सांगणारी ती पोस्ट होती. यासोबतच गौहरने कोणाचंही नाव न घेतला म्हटलं, ‘काही लोक इस्लाम धर्माची खिल्ली उडवत आहेत. भयानक दिसणारी व्यक्ती अबाया परिधान केल्याने मुस्लिम बनत नाही. अशा पद्धतीचा ड्रामा करणारी लोकं उमराह करण्यासाठी त्या पवित्र जागी पोहोचू कसे शकतात, यावर माझा विश्वासच बसत नाही. तिथे जाऊन नवीन ड्राम करत आहेत. एका मिनिटात इस्लाम कबूल केलं जातं आणि दुसऱ्या मिनिटाला म्हणतात की त्यांनी आपल्या मर्जीने हे सर्व केलं नाही. हा सर्व मूर्खपणा आहे.’
View this post on Instagram
राखीवर कारवाई करण्याची मागणी
या पोस्टमध्ये गौहरने पुढे लिहिलं, ‘लोकांना जेव्हा प्रसिद्धी हवी असते तेव्हा ते इस्लाम धर्म स्वीकारतात, अन्यथा नाही. त्यांना लाज वाटली पाहिजे. मी सौदी आणि इंडियाच्या बोर्ड ऑफ इस्लामला याविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती करते. जेणेकरून पुन्हा कधी कोणी अशा पद्धतीने धर्माची मस्करी करणार नाही.’ राखीने उमराह करतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र हा सर्व ड्रामा असल्याचे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. इतकंच नव्हे तर भारतात परतल्यानंतर मला राखी नाही तर फातिमा म्हणा, असंही ती पापाराझींना म्हणाली. राखीने आदिलवर बरेच आरोप केले आहेत. आदिलने बळजबरीने माझं धर्म परिवर्तन केलं, असं राखी एका पत्रकार परिषदेत म्हणाली. तर दुसरीकडे राखीला स्वत:ला इस्लाम धर्म स्वीकार करायचा होता, असं स्पष्टीकरण आदिलने दिलं.