‘बिग बॉस’ विजेती अभिनेत्रीला पुरुषाने लगावली कानशिलात, रॅम्पवर फाटला ड्रेस, अडकली वदाच्या भोवऱ्यात

Bollywood Actress Life: 'तू मुस्लीम आहेस, इतके लहान कपडे...', जेव्हा अज्ञात व्यक्ती बिग बॉस' विजेती अभिनेत्रीच्या लगावली कानशिलात, तर कधी सर्वांसमोर फाटला ड्रेस... वादग्रस्त कारणामुळे अभिनेत्री चर्चेत...

'बिग बॉस' विजेती अभिनेत्रीला पुरुषाने लगावली कानशिलात, रॅम्पवर फाटला ड्रेस, अडकली वदाच्या भोवऱ्यात
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 9:56 AM

झगमगत्या विश्वात अभिनेत्री अनेक संकटांचा सामना करत असतात. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मुली येतात. अशीच एक मुलगी पुण्यातून आली आणि तिने झगमगत्या विश्वात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. पण त्यासाठी अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पुणे ते झगमगत्या विश्वापर्यंतचा तिचा प्रवास फार सोपा नव्हता. अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग करत अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर अभिनेत्री स्वतःचं नाव कोरलं… पण अनेक वादग्रस्त परिस्थितीमध्ये देखील अभिनेत्री अडकली… सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गौहर खान आहे.

गौहर खान फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जेव्हा गौहर खान हिने 2002 ते 2006 पर्यंत रॅप्म वॉक केला. तेव्हा एकदा सर्वांसमोर अभिनेत्रीचा ड्रेस फाटला. पण स्वतःचा आत्मविश्वास कमी न होऊ देता अभिनेत्री रॅम्प वॉक पूर्ण केला. तेव्हा गौहर खान हिचं सर्वत्र कौतुक झालं. गौहरने 2002 मध्ये मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भाग घेतला होता. यानंतर तिने अनेक वर्षे मॉडेलिंगमध्ये संघर्ष केला आणि मागे वळून पाहिले नाही.

सर्वासमोर गौहर खान हिला लगावलेली कानशिलात

एका शो दरम्यान एका पुरुषाने गौहर खान हिच्या कानशिलात लगावली होती. तेव्हा त्याठिकाणी अनेक लोकं उपस्थित होते. रिपोर्टनुसार, मोहम्मद अकिल मलिक नावाच्या एका व्यक्तीने गौहर खान हिला वाईट प्रकारे स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्री मोहम्मद अकिल मलिक याला विरोध केल्यानंतर त्याने अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली…

शिवाय मोहम्मद अकिल मलिक अभिनेत्रीला म्हणाला, ‘तू मुस्लीम आहेस, इतके लहान कपडे कसे घालू शकतेस…? मुस्लीम असून घाणेरड्या गाण्यांवर डान्स करते… हे सर्व तुला शोभा देत नाही…’ तेव्हा त्या व्यक्तीला पोलिसांनी तत्काळ अटक देखील केली होती.

गौहर खान हिचे सिनेमे…

गौहर खान हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकेट सिंह: सेल्समैन ऑफ द ईयर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ‘इशकजादे’ सिनेमामुळे गौहर खान हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमात अभिनेत्रीने ‘छोकरा जवां रे’ आणि ‘झल्ला वाले’ गाण्यावर दमदार डान्स केला होता.

अभिनेत्रीच्या अदा चाहत्यांना प्रचंड आवडल्या होत्या. शिवाय अभिनेत्री विद्या बालन स्टारर ‘बेगम जान’ सिनेमात देखील गौहर हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गौहर हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. अनेक शोमध्ये अभिनेत्रीने होस्टची भूमिका देखील पार पाडली आहे. गौहर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते…

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.