मुंबईच्या ‘या’ भागात गाैरी खान हिने सुरू केले आलिशान रेस्टॉरंट, थेट शाहरुख खान..
शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान ही कायमच चर्चेत असते. गाैरी खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गाैरी खान ही सोशल मीडियावर सक्रिय देखील दिसते. गाैरी खान हिने आता नवीन व्यवसायामध्ये देखील पर्दापण केले आहे. मुंबईमध्ये तिने रेस्टॉरंट सुरू केले आहे.

मुंबई : शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान ही कायमच चर्चेत असते. गाैरी खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे बऱ्याच बिझनेसमध्ये गाैरी खान ही सक्रिय दिसते. गाैरी खान कायमच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. गाैरी खान हिने आतापर्यंत अनेक कलाकारांचे आणि सेलिब्रेटिनची घरे आणि ऑफिसेस डिजाइन केले आहेत. काही दिवसांपूर्वीच गाैरी खान हिने अनन्या पांडे हिचे घर डिझाईन केले. ज्याचे फोटो अनन्या पांडे हिने सोशल मीडियावर शेअर करत गाैरी खानचे धन्यवाद मानले.
आता नुकताच शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान हिने मुंबईमध्ये एक आलिशान असे रेस्टॉरंट सुरू केलंय. विशेष म्हणजे गाैरी खान हिने सुरू केलेले हे रेस्टॉरंट अत्यंत आलिशान आहे. गाैरी खान हिने मुंबईच्या बांद्रा परिसरात हे रेस्टॉरंट सुरू केले आहे. विशेष म्हणजे हे रेस्टॉरंट तिनेच डिझाईन केल्याचे देखील कळते. या रेस्टॉरंटचे काही फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.
गाैरी खान हिने या रेस्टॉरंटच्या उद्धाटनासाठी काही बाॅलिवूड कलाकारांना देखील बोलावले होते. आता याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. गाैरी खान हिच्या रेस्टॉरंटच्या उद्धाटनाला करण जोहर, सुजैन खान, नीलम कोठारी, भावना पांडे, महिप कपूर, चंकी पांडे, सीमा सजदेह, अविनाश गोवारीकर हे पोहचले होते.
गाैरी खानने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केलीये. काही फोटो शेअर करत गाैरी खान हिने लिहिले की, हॉस्पिटॅलिटीच्या फील्डमध्ये माझा पहला वेंचर तोरी मुंबई…गाैरी खान हिच्या रेस्टॉरंटचे नाव तोरी आहे. गाैरी खान हिच्या या रेस्टॉरंटची जोरदार चर्चा सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. हे एक लग्झरी रेस्टॉरंट आहे.
काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याच्याबद्दल अत्यंत मोठा असा खुलासा करण्यात आला. शाहरुख खान हा रात्री गाैरी खान हिला नाही तर एका दुसऱ्याच मुलीला फोनवर बोलत असतो. विशेष म्हणजे ही मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून शाहरुख खान आणि गाैरी खान यांची लेक सुहाना खान आहे. सुहाना खान ही विदेशात असून शाहरुख खान ही दिलाच रात्रभर गप्पा मारत बसतो.