इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना गौरी खानने एडिट केला फोटो? महिन्याभरानंतर युजरने दाखवला खरा फोटो
या कार्यक्रमात तिने कॅमेरासमोर काही पोझ दिले आणि नंतर इन्स्टाग्रामवरही त्याचे फोटो पोस्ट केले. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. मात्र आता जवळपास महिन्यानंतर एका रेडिट युजरने गौरीचा त्याच कार्यक्रमातील फोटो पोस्ट केला आहे.
मुंबई : अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने जानेवारी महिन्यात दुबईतील एका आलिशान हॉटेलच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने कॅमेरासमोर काही पोझ दिले आणि नंतर इन्स्टाग्रामवरही त्याचे फोटो पोस्ट केले. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. मात्र आता जवळपास महिन्यानंतर एका रेडिट युजरने गौरीचा त्याच कार्यक्रमातील फोटो पोस्ट केला आहे. गेट्टी इमेजेसकडून गौरीचा हा फोटो क्लिक करण्यात आला होता. गौरीचे हे फोटो एटिड न केलेले आणि मूळ आहेत, ज्यामध्ये तिचा रंग थोडा अधिक सावळा असल्याचं पहायला मिळतंय. मात्र हाच मूळ फोटो गौरीने एडिट करून तिच्या इन्स्टावर पोस्ट केल्याचं संबंधित युजरने म्हटलंय. यावरूनच तिला नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल केलं जातंय.
‘प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास ती मूळ फोटोमध्येच चांगली दिसतेय. मात्र एटिड केलेल्या फोटोने सर्व वाट लावली’, असं एकाने लिहिलंय. तर ‘सेलिब्रिटींनाही त्यांच्या रंगाविषयी न्यूनगंड असतो. तिने मूळ फोटो पोस्ट केला असता तर त्यावरूनही तिला ट्रोल केलं असतं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. या कमेंट्समध्ये काहींनी गौरीचा बचाव केला तर काहींनी तिच्यावर टीका केली.
गौरी इंटेरिअर डिझायनर असून आजवर तिने मोठमोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. इन्स्टाग्रामवरही ती बरीच सक्रिय असते. तिचे चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
शाहरुख-गौरीची लव्हस्टोरी
शाहरुख खान आणि गौरीची पहिली भेट 1984 मध्ये एका मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यावेळी शाहरुख फक्त 18 वर्षांचा होता. शाहरुखने गौरीला पाहिलं आणि त्यानंतर त्याने मित्राला तिच्याबद्दल विचारलं. शाहरुखच्या मित्राने गौरीशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती तिच्या बॉयफ्रेंडची वाट पाहत असल्याचं समजलं.
गौरीने शाहरुखच्या मित्रासोबत डान्स करणं टाळण्यासाठी बॉयफ्रेंडची वाट पाहत असल्याचं खोटं सांगितलं होतं. मात्र खरंतर ती तिच्या भावाची वाट पाहत होती. नंतर गौरीशी मैत्री झाल्यानंतर शाहरुखने एकदा तिला प्रपोज केलं. मात्र कुटुंबीयांना पसंत नसल्याने गौरीने त्याला पहिल्यांदा नाकारलं होतं. रिलेशनशिपपासून ब्रेक मिळावा यासाठी ती त्याला न सांगताच मुंबईला निघून आली होती. त्याचवेळी शाहरुखसुद्धा मुंबईत आला.
मुंबईत शाहरुख आणि त्याच्या मित्रांनी गौरीचा शोध घेतला. तेव्हा अखेर समुद्रकिनारी दोघांची भेट झाली. त्यावेळी पुन्हा एकदा शाहरुखने गौरीला प्रपोज केलं होतं. मात्र दुसऱ्यांदाही तिने नकार दिला. दुसऱ्यांदा प्रपोज केल्यानंतर वर्षभराने गौरी शाहरुखकडे आली. त्यावेळी शाहरुखच्या आईचं निधन झालं होतं. अखेर 25 ऑक्टोबर 1991 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.