Gautami Patil झळकणार ‘या’ सिनेमामध्ये; मोठी अपडेट समोर

Gautami Patil | गौतमी पाटील झळकणार रुपेरी पडद्यावर... 'या' सिनेमाच्या माध्यमातून नव्या कालाकारांना मिळणार संधी.. कोणता आहे 'तो' सिनेमा? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी पाटील हिचीच चर्चा... पुढच्या महिन्यात सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

Gautami Patil झळकणार 'या' सिनेमामध्ये; मोठी अपडेट समोर
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 11:25 AM

रवी लवेकर, टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी : पंढरपूर |    प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) कायम सर्वत्र चर्चेत असते. गौतमीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दमदार डान्स अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी गौतमी आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी पाटील हिची चर्चा रंगत आहे. शिवाय गौतमी पाटील नव्या सिनेमात दिसणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे..

गौतमी पाटील लवकरच “घुंगरू एक संघर्ष” सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्रभर आपल्या अदाकारीने तरुणांच्या ह्रुदयात स्थान निर्माण करणारी गौतमी पाटील हिच्या नव्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आता चाहते आहेत. लोककलावंताच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाची कथी रहस्यमय गोष्टी, लव्ह स्टोरी आणि जीवनाचे संघर्ष इत्यादी रंजक गोष्टींभोवती फिरताना दिसत आहे.

“घुंगरू” सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक बाबा गायकवाड यांच्या खांद्यावर असून, त्यांनी अनेक नवीन कालाकारांनी संधी दिली आहे. ज्यामुळे ‘घुंगरू’ सिनेमाच्या माध्यमातून नवीन कालाकार चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. प्रेक्षकांना खुर्चीला शेवटपर्यंत बांधून ठेवणारा हा सिनेमा असेल…. असं देखील सांगण्यात येत आहे.

“घुंगरू” हा सिनेमाची काम शेवटच्या टप्प्यात असून पुढील महिन्यात सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा लोक कलावंताच्या जीवनातील संघर्षावर असून यामध्ये विविध पैलू दडलेले आहेत. गौतमीचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गौतमी पाटील सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमलेली असते. आता गौतमी मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे.

प्रसिद्धी झोतात आल्यापासून गौतमी हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक खुलासे केले आहे. आता गौतमी हिच्या आगामी सिनेमाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.