Gautami Patil | गौतमी पाटील म्हणतेय ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’; नव्या गाण्यावर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा नवीन व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'माझा कारभार सोपा नसतोय रं'असं तिच्या या नवीन गाण्याचं नाव आहे. या गाण्याला अवघ्या काही तासांतच युट्यूबवर 58 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Gautami Patil | गौतमी पाटील म्हणतेय 'माझा कारभार सोपा नसतोय रं'; नव्या गाण्यावर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव
Gautami PatilImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 12:59 PM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : ‘सबसे कातिल.. गौतमी पाटील’ हा डायलॉग म्हणताच डोळ्यांसमोर नृत्यांगना गौतमी पाटीलचा चेहरा समोर येतो. गौतमीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची अक्षरश: झुंबड उडते. आपल्या नृत्यातून आणि दिलखेचक अदांनी गौतमीने तरुणांना घायाळ केलं आहे. नुकतंच तिचं नवीन गाणं प्रदर्शित झालं असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे. ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’ असं गौतमीच्या या नव्या गाण्याचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिने या गाण्याची झलक दाखवली आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

गौतमीचं नवीन गाणं

या नव्या गाण्यात गौतमीचा नवीन लूकसुद्धा पहायला मिळतोय. अवघ्या काही तासांत या गाण्याला युट्यूबवर 58 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. ‘एका नजरेत ठार होती पोरं हजार, माझ्या तिरान आशिक फसतोय ररर… सादर करीत आहोत सबसे कातिल गौतमी पाटीलचा अनोखा अंदाज’, असं लिहित हा व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषकरून तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. ती डान्सदरम्यान अश्लील अदा करत असल्याची टीका झाली होती. या टीकेनंतर गौतमीने स्वत:हून माफी मागितली आणि अश्लील वाटणाऱ्या स्टेप्स करणं तिने टाळलं.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे दहा लाख फॉलोअर्स आहेत. संपूर्ण राज्यभरात तिची क्रेझ पहायला मिळते. एखाद्या सेलिब्रिटीइतकाच तिचा स्टारडम आहे. वाढदिवस असो किंवा एखादं उद्धाटन.. गौतमीला आमंत्रित केल्यास तिथे गर्दी होणार हे निश्चित असतं. तिला आणि तिच्या डान्सला पाहण्यासाठी असंख्य चाहते कार्यक्रमाला गर्दी करतात. अनेकदा तिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी, धक्काबुक्की झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

गौतमी आणि गर्दी..

गौतमी आणि गर्दी हे जणू आता समीकरणच झालं आहे. राज्यातील असा एक जिल्हा नसेल जिथे गौतमीचा कार्यक्रम होत नसेल. अगदी वाढदिवसानिमित्तही गौतमीला बोलावलं जातं. गौतमीच्या डान्सला आणि तिच्या कार्यक्रमांना विरोध होत असला तरी तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तिच्याविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या आडनावावरूनही वाद झाला होता.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.