VIDEO: गहना वशिष्ठचा एकता कपूरवर गंभीर आरोप, “तिच्यामुळे मी आत्महत्येचा विचार..”

विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिने निर्माती एकता कपूरवर (Ekta Kapoor) गंभीर आरोप केले आहेत. एकता कपूरमुळे मी आत्महत्या करणार होती, असं धक्कादायक विधान गहनाने केलं.

VIDEO: गहना वशिष्ठचा एकता कपूरवर गंभीर आरोप, तिच्यामुळे मी आत्महत्येचा विचार..
Ekta Kapoor and Gehana VasisthImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:19 AM

विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिने निर्माती एकता कपूरवर (Ekta Kapoor) गंभीर आरोप केले आहेत. एकता कपूरमुळे मी आत्महत्या करणार होती, असं धक्कादायक विधान गहनाने केलं. एकताच्या बालाजी फिल्म्सने माझे तीन महिने वाया घालावले, असं तिचं म्हणणं आहे. अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्म अभिनेत्री कंगना रनौतचा ‘लॉक अप’ (Lock Upp) हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोमध्ये आतापर्यंत विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लॉक अपमध्ये हजेरी लावण्यासाठी गहना वशिष्ठलाही निर्मात्यांनी संपर्क केला होता. इतकंच नव्हे तर तिच्याशी त्यांनी तसा करारसुद्धा केला होता. करार झाल्यानंतर ऐनवेळी त्यांनी शोमध्ये मला बोलावलं नाही आणि त्यामुळेच माझं बरंच नुकसान झालंय, अशी तक्रार गहनाने केली. “‘लॉक अप’ या शोसाठी मी माझा बराच वेळ खर्ची केला असून त्यामुळे इतरही काम स्वीकारलं नाही. मात्र आता त्याच शोमुळे माझं आर्थिक नुकसान झालंय”, असं म्हणत गहनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला.

‘लॉक अप’चे निर्माते स्वत:हून गहनाकडे आले होते, असं ती या व्हिडीओत म्हणाली. “आधी मानधनाविषयी चर्चा झाली. दर आठवड्याला दीड लाख रुपये मानधन देण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर त्यांनी मला करारसुद्धा दिला होता. माझ्याकडे अधिकृत कागदपत्रे आणि चॅट्सचे पुरावेदेखील आहेत,” असं गहनाने सांगितलं. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘मी गहना वशिष्ठ, मनापासून हे सर्व खरं बोलतेय. गेल्या तीन, साडेतीन महिन्यांपासून माझ्यासोबत काय घडलं, मी कोणत्या परिस्थितीतून गेले, माझ्या मनस्तापाचं कारण फक्त आणि फक्त बालाजी प्रॉडक्शन हाऊस आहे. त्यांच्यामुळेच मी माझ्या घरी कामाविना बसले. मला तुमचा पाठिंबा हवा आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाही. मी कोणाचंही लक्ष वेधण्यासाठी हे सर्व करत नाहीये. हे कटू सत्य आहे. एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचा हा खरा चेहरा आहे.’

पहा व्हिडीओ-

गहनाच्या या व्हिडीओवर एकता कपूर किंवा अल्ट बालाजीकडून अद्याप कोणतंही उत्तर आलं नाही. ‘लॉक अप’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. आतापर्यंत या शोमध्ये विविध सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये कंगना दर वीकेंड्या एपिसोडमध्ये परीक्षक म्हणून हजेरी लावते.

हेही वाचा:

KGF Chapter 2: क्लायमॅक्सच्या सीनवर थिएटरमध्ये नाण्यांचा वर्षाव; रवीनाने शेअर केला पडद्यामागील दृश्यांचा Video

Kajal Aggarwal: ‘सिंघम’ फेम काजल अगरवाल झाली आई; घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.