‘माझा नवरा जगातील सर्वात…’, रितेश देशमुख याच्यासाठी जिनिलिया डिसूझाची खास पोस्ट

| Updated on: Dec 17, 2023 | 1:39 PM

Riteish Deshmukh : रितेश देशमुख याला जिनिलिया डिसूझा असं काय म्हणाली, ज्यामुळे चाहते म्हणत आहेत, 'जगातील सर्वात बेस्ट जोडी...', रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांची जोडी सध्या तुफान चर्चेत...

माझा नवरा जगातील सर्वात..., रितेश देशमुख याच्यासाठी जिनिलिया डिसूझाची खास पोस्ट
Follow us on

मुंबई | 17 डिसेंबर 2023 : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश आणि जिनिलिया यांचीच चर्चा रंगली आहे. जिनिलिया हिने पती रितेश याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिनिलिया हिने रितेशसाठी लिहिलेली पोस्ट दोघांच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडली आहे. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, आता जिनिलिया हिने रितेशसाठी पोस्ट का लिहिली. यामागे कारण देखील तितकंच खास आहे. रितेश देखमुख याचा वाढदिवस असल्यामुळे जिनिलिया हिने पतीला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश याच्यासोबत खास फोटो पोस्ट करत जिनिलिया कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘जर कोणी मला विचारलं ‘रितेश देशमुख कोण आहे?’ मी फक्त म्हणेल, ‘जगातील सर्वात उत्तम पुरुष आणि तो सर्वात उत्तम पुरुष पूर्णपणे माझा आहे…’ वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरा…’ सध्या जिनिलिया हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

जिनिलिया हिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. फक्त चाहत्यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील रितेश याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. रितेश – जिनिलिया कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

रितेश – जिनिलिया कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. चाहते देखील दोघांच्या प्रत्येक सोशल मीडियावर पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश – जिनिलिया यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

रितेश आणि जिनिलिया यांचं रिलेशनशिप आणि लग्न

रितेश आणि जिनिलिया यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतक 2012 मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर 2014 मध्ये रितेश आणि जिनिलिया यांनी रियान याचं जगात स्वागत केलं. त्यानंतर 2016 मध्ये रितेश आणि जिनिलिया यांनी दुसरा मुलगा राहिल याला जन्म दिला.