Genelia D’souza | अभिनयातून 10 वर्षे ब्रेक का घेतला? अखेर जिनिलियाने सांगितलं खरं कारण

जिनिलियाच्या मराठीतील पदार्पणाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या कमबॅकच्या प्रवासाविषयी उलगडून सांगितलं. त्याचप्रमाणे तिने कामातून एवढा मोठा ब्रेक का घेतला होता, यामागचंही कारण स्पष्ट केलं.

Genelia D'souza |  अभिनयातून 10 वर्षे ब्रेक का घेतला? अखेर जिनिलियाने सांगितलं खरं कारण
Ved MovieImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 4:10 PM

मुंबई: अभिनेत्री जिनिलिया डिसूझाने तब्बल 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं. ‘वेड’ या मराठी चित्रपटात तिने पती रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिका साकारली. रितेशनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. रितेश – जिनिलियाची ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना आवडतेच. मात्र या जोडीला ऑनस्क्रीन पाहणंही चाहत्यांसाठी पर्वणी असते. जिनिलियाच्या मराठीतील पदार्पणाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने या कमबॅकच्या प्रवासाविषयी उलगडून सांगितलं. त्याचप्रमाणे तिने कामातून एवढा मोठा ब्रेक का घेतला होता, यामागचंही कारण स्पष्ट केलं.

“चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद खूपच प्रेरणादायी आणि अद्भुत आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूपच खास होता, कारण जेव्हा तुम्ही 10 वर्षांनंतर परत येता, तेव्हा तुमच्या मनात विविध प्रश्न घोंघावत असतात. मी खरंच स्क्रीनवर उत्तम काम करू शकेन का, मला जी कामगिरी करायची आहे, त्यात मी सर्वोत्तम योगदान देऊ शकेन का, असे प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले होते”, असं जिनिलिया म्हणाली.

“जेव्हा तुमच्या कामाचं कौतुक होतं, तेव्हा ती खूप चांगली भावना असते. या यशाचा आनंद मी शेवटच्या क्षणापर्यंत घेणार आहे. हे काही काळापुरतं जरी असलं तरी वेडचा हा प्रवास माझ्या मनात कायम उत्सुकता आणि आनंद निर्माण करणारा असेल”, असं ती पुढे म्हणाली.

हे सुद्धा वाचा

जिनिलियाने मध्यंतरीच्या काळात जय हो आणि फोर्स 2 मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र 2012 मधील ‘ना इष्टम’ या तेलुगू चित्रपटानंतर ‘वेड’मध्येच तिने मुख्य भूमिका साकारली. कुटुंबाकडे अधिक लक्ष देता यावं यासाठी ग्लॅमर विश्वातून ब्रेक घेतल्याचं तिने स्पष्ट केलं. रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहील ही दोन मुलं आहेत.

या ब्रेकविषयी जिनिलियाने सांगितलं, “मी माझी पावलं मागे घेतली कारण मला स्वत:साठी काहीतरी करायचं होतं. मला माझं कुटुंब हवं होतं. कुटुंबासाठी असलेल्या माझ्या जबाबदाऱ्या पार पाडत चित्रपटांमध्येही काम करणं मला जमलं नसतं. त्याबद्दल मला आत्मविश्वास नव्हता. हा निर्णय माझा होता आणि त्यात मी आनंदी होते. एक गृहिणी, पत्नी आणि आई झाल्यानंतर माझ्या व्यक्तिमत्त्वाच बरेच सकारात्मक बदल झाले. माझी प्रॉडक्शन कंपनी, म्युझिक कंपनीसुद्धा आहे. अभिनयाशिवाय मी वेगळंसुद्धा काहीतरी करू शकते, हे त्यातून सिद्ध झालं.”

“हा चित्रपट जर रितेशचा नसता तर कदाचित मी आणखी मोठा ब्रेक घेतला असता. त्यानेच मला या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी आग्रह केला”, असंही जिनिलियाने स्पष्ट केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.