वरुण धवनने सर्वांसमोर उचलून घेऊन केलं किस; ‘त्या’ कृत्यानंतर जगप्रसिद्ध मॉडेलची पोस्ट व्हायरल

‘हे खूपच अपमानकारक आहे. ती किती अनकम्फर्टेबल झाली हे स्पष्ट दिसतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘असं करण्याची काहीच गरज नव्हती. ज्याप्रकारे ती नंतर पळाली, ते पाहून असं वाटतंय की ती भारतात परत कधीच येणार नाही’, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली.

वरुण धवनने सर्वांसमोर उचलून घेऊन केलं किस; 'त्या' कृत्यानंतर जगप्रसिद्ध मॉडेलची पोस्ट व्हायरल
Varun Dhawan and Gigi HadidImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 8:31 AM

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अमेरिकी सुपरमॉडेल गिगी हदिद यांचा एक व्हिडीओ रविवारी दिवसभर चर्चेचा विषय ठरला होता. नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटरसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ होता. वरुण धवन या कार्यक्रमात स्टेजवर परफॉर्म करत होता. त्याचवेळी त्याने प्रेक्षकांमध्ये उभ्या असलेल्या गिगीला मंचावर बोलावलं आणि तिला उचलून घेतलं. त्यानंतर त्याने तिच्या गालावर किस केला. हे सर्व घडत असताना गिगी खूप अनकम्फर्टेबल दिसत होती, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे वरुणच्या अशा वागणुकीवरून नेटकऱ्यांनी त्याला खूप ट्रोल केलं. यावर वरुणने ट्विट करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं असतानाच आता गिगीचीही पोस्ट व्हायरल होत आहे.

काय म्हणाले नेटकरी?

‘हे खूपच अपमानकारक आहे. ती किती अनकम्फर्टेबल झाली हे स्पष्ट दिसतंय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘असं करण्याची काहीच गरज नव्हती. ज्याप्रकारे ती नंतर पळाली, ते पाहून असं वाटतंय की ती भारतात परत कधीच येणार नाही’, अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. ‘हेच वरुणच्या पत्नीसोबत कोणी केलं तर’, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. ‘मंचावर सर्वांसमोर असं काही करण्याआधी किमान तिला विचारा तरी’, असंही युजर्सनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

वरुण धवनचं सडेतोड उत्तर

अशाच एका युजरच्या ट्विटवर वरुणने उत्तर दिलं आहे. गिगीला मंचावर बोलावणं हे आधीच ठरलं होतं, असं स्पष्टीकरण त्याने दिलं आहे. ‘मला असं वाटतं की आज तू झोपेतून जागी झालीस आणि आज तुझे डोळे उघडलेस. तर मी तुझ्या भ्रमाचा फुगा फोडतो आणि हे स्पष्ट करतो की ते सर्व तिच्यासाठी आधीच प्लॅन केलं होतं. तिला स्टेजवर आणण्याचं आधीच ठरवलं गेलं होतं. त्यामुळे बाहेर जाऊन गोष्टींबद्दल काहीतरी करण्याऐवजी ट्विटरवरच काहीतरी नवीन कारण शोधत बस. गुड मॉर्निंग,’ अशा शब्दांत वरुणने उत्तर दिलं.

गिगीची पोस्ट व्हायरल

डिझायनर प्रबल गुरुंगने वरुण आणि गिगीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. तोच व्हिडीओ इन्स्टा स्टोरीमध्ये गिगीने शेअर केला. त्यावर तिने लिहिलं, ‘वरुण धवनने माझं बॉलिवूडचं स्वप्न सत्यात आणलं’. त्यामुळे जे काही घडलं ते गिगीच्या मनाविरोधात नव्हतं हे स्पष्ट झालंय.

कोण आहे गिगी हदिद?

गिगी हदिद ही डच-पॅलेस्टाइन मॉडेल आहे. जेलेना नौरा हदिद असं तिचं नाव आहे. लॉस एंजिलिसमध्ये तिचा जन्म झाला. लहानपणापासूनच तिने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावलं. तिने आजवर अत्यंत प्रतिष्ठित फॅशन शोजमध्ये हजेरी लावली असून प्रसिद्ध मासिकांच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.