‘रात्रभर रडलीये वाटतं…’, अरबाज खान याच्या दुसऱ्या लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडचा ‘तो’ व्हिडीओ समोर

| Updated on: Dec 27, 2023 | 3:25 PM

Arbaaz Khan : शूरा खान आयुष्यात येताच अरबाज खान याने सोडली एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीची साथ? अभिनेत्याच्या लग्नानंतर जॉर्जियाचा 'तो' व्हिडीओ समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॉर्जिया हिच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा...

रात्रभर रडलीये वाटतं..., अरबाज खान याच्या दुसऱ्या लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडचा तो व्हिडीओ समोर
Follow us on

मुंबई | 27 डिसेंबर 2023 : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान (Arbaaz Khan) याने 24 डिसेंबर रोजी 15 वर्ष लहान मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थितीत अरबाज आणि शूरा यांचा निकाह संपन्न झाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शूरा आणि अरबाज यांच्या निकाहची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, दोघांच्या निकाहचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अरबाज खान याची एक्स गर्लफ्रेंड आणि परदेशातील मॉडल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जॉर्जिया एंड्रियानी हिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज यांचं ब्रेकअप झालं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकरी जॉर्जिया हिला ट्रोल करत आहेत, तर काहींनी मात्र जॉर्जिया हिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

हे सुद्धा वाचा

 

एक्स बॉयफ्रेंड अरबाज खानच्या लग्नानंतर दोन दिवसांनी जॉर्जिया सर्वांसमोर आली. व्हिडीओमध्ये जॉर्जिया निळ्या रंगाच्या टर्टल नेक टॉप आणि प्रिंटेड मिनी स्कर्टमध्ये दिसली. शिवाय जॉर्जिया हिने काळ्या रंगाचा सनग्लासेसही लावल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत जॉर्जिया हिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘रात्रभर रडलीये वाटतं…’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘डोळे रडून रडून सुजले असतील म्हणून सनग्लासेस लावले आहे….’ सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र जॉर्जिया आणि अरबाज यांच्या नात्याची चर्चा होती.

जॉर्जिया आणि अरबाज यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जॉर्जिया आणि अरबाज याचं ब्रेकअप 2022 मध्ये झालं. दोघांमध्ये असलेल्या काही मतभेदांमुळे नातं टिकणार नव्हतं… हे सत्य जॉर्जिया आणि अरबाज दोघांना माहिती होतं. म्हणून दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असं जॉर्जिया एका मुलाखतीत म्हणाली होती.