गोवा फॉरवर्ड पार्टी आक्रमक, ‘सूर नवा ध्यास नवा’चे गोव्यातील चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न! पाहा नेमकं काय झालं…

भारतातील इतर राज्यांसह गोव्यातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे, पण या लॉकडाऊनमध्येही पर्यटकांची येणे-जाणे आणि कोणत्याही कडक निर्बंधाशिवाय टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टी आक्रमक, ‘सूर नवा ध्यास नवा’चे गोव्यातील चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न! पाहा नेमकं काय झालं...
सूर नवा ध्यास नवा
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 11:25 AM

मुंबई : भारतातील इतर राज्यांसह गोव्यातही कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे, पण या लॉकडाऊनमध्येही पर्यटकांची येणे-जाणे आणि कोणत्याही कडक निर्बंधाशिवाय टीव्ही मालिकांचे शूटिंग सुरू झाले आहे आणि म्हणूनच गोव्यातील स्थानिकांचे बरेच हाल होत आहेत. हा लॉकडाऊन केवळ सर्वसामान्यांसाठी आहे का? यामुळे गोव्यातील कोरोना वाढत आहे, असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागल्याने सध्या अनेक मालिकांचे चित्रीकरण गोव्यात सुरु आहे (Goa Forward Party Vijay Sardesai takes objection on sur nava dhyas nava shooting in goa).

अलीकडेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे माजी आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी एका रिअॅलिटी शोचे शूटिंग थांबवले आहे. विजय सरदेसाई यांनी गोव्यातील फातोर्डा, मडगाव येथे सुरू असलेल्या कलर्स मराठीच्या ‘सुर नवा ध्यास नवा’ (sur nava dhyas nava) या सिंगिंग रिअॅलिटी शोचे शूटिंग थांबवले आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, विजय सरदेसाई कॅमेर्‍यासह स्टुडिओच्या आत जाऊन तिथली परिस्थिती दाखवत आहेत. या शूटिंगदरम्यान कोणीही सामाजिक अंतराचे नियम पाळत नाहीय आणि तसे कोणीही मास्क देखील लावलेले नाही.

पहा व्हिडीओ

शासनानेच दिलीय परवानगी

विजय सरदेसाई म्हणतात की, गोव्याच्या रवींद्र भवन (Ravindra Bhavan, Goa) येथे होणारे हे शूटिंग इच्छा असून ही ते थांबवू शकत नाही, कारण त्यांना सरकारने परवानगी दिली आहे. अशा शूटिंगमुळे ठिकठिकाणी  कोरोनाचे हॉटस्पॉट्स वाढतच चालले आहेत. गोव्यात एका बाजूला शुटींग व दुसऱ्या बाजूला कोळसा खाणीत सुरु असलेले खाणकाम यामुळे लोक हैराण झाले आहेत. यामुळे, गोव्यात राहणे स्थानिक लोकांसाठी अवघड झाले आहे कारण आता संपूर्ण गोवा कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे (Goa Forward Party Vijay Sardesai takes objection on sur nava dhyas nava shooting in goa).

अवधूत गुप्तेंनी केला समजवण्याचा प्रयत्न

यावेळी ‘सूर नाव ध्यास नवा’ या रिअॅलिटी शोचे न्यायाधीश आणि प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या स्पष्टीकरणानंतरही विजय मागे हटले नाहीत. अवधूत गुप्ते आणि सेटवरील उपस्थित कर्मचार्‍यांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, हे सर्व जण कोरोना टेस्ट करुन गोव्यात आले होते आणि बायो बबलमध्ये शूट करत होते. पण तरीही त्यांच्या समजवण्याचा काहीही परिणाम झाला नाही.

सर्वसामान्यांचेही सहकार्य

गोव्यात शूटिंगला विरोध वाढत आहे. ज्याप्रकारे मुंबईत शूटिंगवर बंदी घालण्यात आली होती, गोव्यातील स्थानिक लोकांकडून शूटिंग थांबवण्याची मागणी होत आहे. कारण गोव्याचा डेथ रेट आणि कोरोना प्रकरणे प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेली आहेत. गेल्या 24 तासांत गोव्यामध्ये 3,496 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत आणि 71 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2,192 रुग्ण बरे झाले आहेत. गोव्यात सध्या 27,964 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

(Goa Forward Party Vijay Sardesai takes objection on sur nava dhyas nava shooting in goa)

हेही वाचा :

Video | बेडरूममध्ये फारशी साफ करतेय ‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी, लेकाचीही दिसली झलक, पाहा व्हिडीओ

डोंबिवलीची फास्ट ट्रेन ते स्वतःची कार, वाचा भाऊ कदम-कुशल बद्रिकेच्या मैत्रीचा अनोखा किस्सा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.