सिद्धू मुसेवालाचा गेम करणाऱ्या मास्टरमाईंड गोल्डी ब्रारचा अमेरिकेत मर्डर, ‘या’ गँगने घेतली जबाबदारी!

Goldy Brar Murder : सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. भर रस्त्यामध्ये गोळ्या घालून सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यात आली. सिद्धूच्या हत्येनंतर गोळीबाराची संपूर्ण जबाबदारी गोल्डी ब्रारने स्वीकारली. आता नुकताच गोल्डी ब्रारबद्दल अत्यंत मोठी माहिती ही पुढे येताना दिसत आहे.

सिद्धू मुसेवालाचा गेम करणाऱ्या मास्टरमाईंड गोल्डी ब्रारचा अमेरिकेत मर्डर, 'या' गँगने घेतली जबाबदारी!
Goldy Brar
Follow us
| Updated on: May 03, 2024 | 8:42 AM

गोल्डी ब्रारची हत्या अमेरिकेत भर रस्त्यावर गोळ्या घालून करण्यात आल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. गोल्डी ब्रारला भारत सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून विदेशात राहून भारतामध्ये गुन्हेगारी वाढवण्याचे काम गोल्डी ब्रारकडून केले जात होते. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारकडून स्वीकारण्यात आली. हेच नाही तर सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळीबार करण्यासाठी जे सहा शूटर निवडले होते ते देखील गोल्डी ब्रारनेच निवडले होते. हे स्वत: गोल्डी ब्रारने कबूल देखील केले होते.

असा दावा केला जातो की, गोल्डी ब्रारवर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात त्याचा मृत्यू झालाय. गोळीबारानंतर लगेचच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. गोल्डी ब्रारचा मृत्यू झाला, या घटनेला अजून अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये. सिद्धू मूसवाला हत्याकांडनंतर पोलिस गोल्डी ब्रारच्या शोधात होते. मात्र, तो अनेक दिवसांपासून विदेशातच आहे.

सिद्धू मूसवाला याच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार होता. सिद्धू मूसवालावर त्याच्या घराच्या हकेच्या अंतरावरच गोळ्या झाडण्यात आल्या. सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर एकच खळबळ बघायला मिळाली. हेच नाही तर सिद्धूच्या हत्येनंतर अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यानंतर गोल्डी ब्रारने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

आता गोल्डी ब्रारवर गोळीबार करण्यात आलाय. गोल्डी ब्रारवर करण्यात आलेल्या या गोळीबाराची जबाबदारी ही डल्ला- लखबीर गँगने घेतलीये. हा गोळीबार वर्चस्वासाठी केल्याची देखील चर्चा आहे. गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख असून तो विदेशातून संपूर्ण गँग चालवत असे. लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी हा एकप्रकारे मोठा धक्का नक्कीच म्हणावा लागणार आहे.

फक्त गोल्डी ब्रार हाच नाही तर लॉरेन्स बिश्नोई गँगचे अनेक सदस्य हे विदेशात असून तिथे राहून हे भारतामध्ये गुन्हेगारीच्या घटना घडवून आणत आहेत. सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणात पोलिस हे गोल्डी ब्रारच्या शोधात होते. सलमान खान याला देखील काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याच्या धमक्या या लॉरेन्स बिश्नोईकडून देण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या भावानेच घेतली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.