Kantara: ‘कांतारा’च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! आता निगेटिव्ह रिव्ह्यूपासून वाचणार ऋषभ शेट्टीचा चित्रपट
'कांतारा' ओटीटीवर पाहणाऱ्यांची झाली निराशा? कोर्टाच्या निर्णयानंतर ऋषभ शेट्टीचं ट्विट चर्चेत
केरळ: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ या चित्रपटाने थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या महिन्याभरानंतरही प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली. त्यानंतर नुकताच हा बहुचर्चित चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र ओटीटीवर ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांची खूप निराशा झाली. याला कारणीभूत होतं चित्रपटातील बदललेलं ‘वराह रुपम’ हे गाणं. क्लायमॅक्सच्या सीनमधील हे गाणं अक्षरश: अंगावर काटा आणणारं असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं होतं. मात्र कॉपीराइटच्या समस्येमुळे निर्मात्यांना ओटीटीवर हे गाणं बदलावं लागलं. आता ‘कांतारा’च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. प्रेक्षकांना आता चित्रपटात मूळ ‘वराह रुपम’ हे गाणं पुन्हा ऐकायला मिळणार आहे.
थैकुडम ब्रीज या केरळातील एका बँडने ऑक्टोबरमध्ये कांतारा चित्रपटातील ‘वराह रुपम’ या गाण्यावर कॉपीराइट्सचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. नवरसम या त्यांच्या गाण्यातून ‘वराह रुपम’ गाणं कॉपी केल्याचं या बँडने म्हटलं होतं. याविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. आता कोझिकोडे जिल्हा न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून गाण्यावरील बंदी उचलण्याचा निर्णय दिला आहे.
ದೈವಾನು ದೈವಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಹಾಗು ಜನರ ಅಭಿಮಾನದಿಂದ ವರಾಹರೂಪಂ ಕೇಸ್ ಗೆದ್ದಿದ್ದೇವೆ. ಜನರ ಕೋರಿಕೆಯನ್ನು ಪರಿಗಣಿಸಿ ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ OTT platform ನಲ್ಲಿ ಹಾಡನ್ನು ಬದಲಾಯಿಸಲಿದ್ದೇವೆ . @VKiragandur@ChaluveG @AJANEESHB @Karthik1423 @hombalefilms @KantaraFilmhttps://t.co/STsNEyKmuT
— Rishab Shetty (@shetty_rishab) December 3, 2022
चित्रपटाचा दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टीने ट्विट करत ही माहिती दिली. ‘देवाच्या कृपेने आणि लोकांच्या प्रेमामुळे आम्ही वराह रुपम गाण्याचा खटला जिंकलोय. लोकांच्या विनंतीनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील गाणं आम्ही लवकरच बदलणार आहोत’, असं ट्विट ऋषभने केलं.
ज्यांनी ‘कांतारा’ हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला, त्यापैकी बहुतांश लोकांना क्लायमॅक्स सीन प्रचंड आवडला. या सीनचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं. ‘कांतारा’च्या क्लायमॅक्समधील प्रेक्षकांना आवडलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘वराह रुपम’ हे गाणं. मात्र हेच गाणं ओटीटीवर बदलल्यामुळे चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यूचा सामना करावा लागला होता.