मामा गोविंदासोबत कृष्णाने मिटवला 7 वर्षांचा वाद; पण मामी अजूनही नाराज? शोमध्येच मागितली माफी

गेल्या काही वर्षांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यात वाद सुरू आहे. गोविंदाने अनेकदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. मात्र त्या एपिसोडमध्ये अभिनय करण्यास कृष्णाने नकार दिला होता. मामासमोर जाणं त्याने टाळलं होतं.

मामा गोविंदासोबत कृष्णाने मिटवला 7 वर्षांचा वाद; पण मामी अजूनही नाराज? शोमध्येच मागितली माफी
Govinda with wife Sunita Ahuja and Krushna AbhishekImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 11:36 AM

अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद तब्बल सात वर्षांनंतर मिटला आहे. वाद मिटल्यानंतर गोविंदा कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. हा खास एपिसोड येत्या 30 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. मात्र गोविंदाशी वाद मिटले असले तरी त्यांच्या पत्नीसोबत अजूनही बोलत नसल्याचं कृष्णाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं. इतकंच काय तर जेव्हा गोविंदा कपिलच्या शोमध्ये आला, तेव्हा कृष्णाने मंचावरूनच मामीची जाहीर माफीसुद्धा मागितली.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा म्हणाला, “बऱ्याच काळानंतर मला इतका चांगला अनुभव आला. मी स्टेजवरच म्हणालो की माझा सात वर्षांचा वनवास संपला आहे. आम्ही आता एकत्र आहोत. आम्ही नाचलो, हसलो आणि खूप मजा केली.” काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. तेव्हा कृष्णा त्याची भेट घेऊ शकला नव्हता. याविषयी तो पुढे म्हणाला, “मामाच्या पायाला दुखापत झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यावेळी मी सिडनीमध्ये होतो आणि मी माझ्या आयोजकांनाही शो रद्द करण्याची विनंती केली होती. पण माझी पत्नी कश्मिरा इथे होती आणि सर्वांत आधी तिनेच रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी गोविंदा मामासुद्धा तिच्याशी खूप चांगलं वागले. रक्ताच्या नाती या शेवटी रक्ताच्याच नाती असतात. त्यांची प्रकृतीही आता ठीक आहे आणि आता ते नाचूही शकतायत.”

यावेळी कृष्णाला मामीसोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना कृष्णाने सांगितलं, “मी त्यांच्या घरी एक-दोनदा गेलो आणि त्यांची मुलगी टीनाशी बोललो. ती पण माझ्याशी खूप चांगलं वागली. आम्ही बऱ्याच काळानंतर भेटतोय असं मला वाटलंच नाही. पण मी अद्याप मामींशी बोललो नाही. पण मला खात्री आहे की त्यासुद्धा ठीक असतील. माझ्या मते त्या ठीकच आहेत, अन्यथा त्यांनी मामांना शोमध्ये पाठवलंच नसतं. कारण मामीच मामांच्या कामाचं शेड्युल सांभाळते आणि जर तिला काही समस्या असतील तर तिने मला किंवा शोला नकार दिला असता. पण तिने नकार दिला नाही. मामा जेव्हा शोमध्ये आले तेव्हा आम्ही खूप मजा केली, डान्स केला, त्यामुळे मला खात्री आहे की मामी आता 50 टक्के तरी ठीक असेल. मी शोदरम्यानही तिची माफी मागितली. कारण मामा म्हणाले की माझी नको मामीची माफी माग.”

हे सुद्धा वाचा

दोघांमधील नेमका वाद काय?

कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वाद 2016 मध्ये सुरू झाला. त्यावेळी कृष्णाने त्याच्या शोमध्ये एक विनोद केला होता आणि गोविंदाला तो फार अपमानास्पद वाटला होता. जेव्हा कृष्णाची पत्नी कश्मिरा शाहने गोविंदावर निशाणा साधत ट्विट केलं, तेव्हा हा वाद आणखी वाढला. या वादादरम्यान सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अनेकदा दोघांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर्षी गोविंदाने भाची आरती सिंहच्या लग्नाला हजेरी लावून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोविंदाने पत्नी सुनिताने अद्याप कृष्णाशी अबोला धरला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.