Bollywood | शाहरुख-सलमान यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे आज घरी बसला गोविंदा!

Bollywood | बॉलिवूडची काळी बाजू समोर आणल्यामुळे गोविंदा बसला घरी? गोविंदा नेमकं काय म्हणाला? २०१९ मध्ये गोविंदा 'रंगिला राजा' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला.. पण अभिनेत्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला, कारण...

Bollywood | शाहरुख-सलमान यांच्याबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे आज घरी बसला गोविंदा!
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 10:17 AM

मुंबई | 04 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान, शाहरुख खान आणि अभिनेता गोविंदा यांना आजही चाहते विसरु शकले नाहीत आणि विसरणार देखील नाहीत. सलमान आणि गोविंदा यांनी अनेक सिनेमांमध्ये एकोत्र स्क्रिन शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील दोघांच्या मैत्रीला डोक्यावर घेतलं. पण ही मैत्री जास्त काळ टिकली नाही. गोविंदा याने शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासोबत इतरांवर निशाणा साधल्यामुळे अभिनेत्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा आणि त्याच्या करियरची चर्चा रंगलेली आहे.

सिनेमा निर्माते आणि सीबीएफसी चे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी अभिनेता गोविंदा याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत निहलानी म्हणाले, ‘डेविड धवन यांच्या प्रत्येक सिनेमात गोविंदा मुख्य अभिनेता म्हणून भूमिका साकारायचा. पण दोघांमध्ये खटके उडाल्यानंतर धवन यांनी गोविंदा यांच्यासोबत काम करणं बंद केलं.’

पुढे निहलानी म्हणाले, ‘जेव्हा गोविंदा यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली, तेव्हा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्याचे संबंध खराब झाले.’ बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आपल्या विरोधात कट रचत आहेत… असं गोविंदा याचा समज होता. हे सर्व गोविंदा याने ‘रंगीला राजा’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी केलं.

‘रंगीला राजा’ सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी देखील पहलाज निहलानी यांच्या खांद्यावर होती. पहलाज निहलानी म्हणाले, ‘गोविंदा याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सिनेमाला अपयशाचा सामना करावा लागला. अनेक डिस्ट्रिब्यूटरने सिनेमाचे शो रद्द केले…सिनेमात गोविंदाने उत्तम काम केलं.’ असं देखील पहलाज निहलानी म्हणाले.

सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये माझ्याविरोधात कट रचण्यात येत आहे… असं गोविंदा अनेकदा म्हणाला होता. पण सलमान खान याच्यावर असणारी नाराजी दूर झाली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा यांची चर्चा रंगली आहे. गोविंदा याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

२०१९ मध्ये गोविंदा ‘रंगिला राजा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. सध्या गोविंदा बॉलिवूडपासून दूर असला तरी चाहत्यांमध्ये कायम उत्सुक असतो.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.