भाचा कृष्णासोबत का झाला होता वाद? गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन

कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वाद 2016 मध्ये सुरू झाला. त्यावेळी कृष्णाने त्याच्या शोमध्ये एक विनोद केला होता आणि गोविंदाला तो फार अपमानास्पद वाटला होता. त्याच विनोदानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि काही वर्षे त्यांनी अबोला धरला.

भाचा कृष्णासोबत का झाला होता वाद? गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन
Krushna Abhishek and GovindaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 10:49 AM

सुपरस्टार गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद जगजाहीर आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या कुटुंबीयांनी अबोला धरला होता. अखेर काही दिवसांपूर्वी जेव्हा गोविंदाच्या पायाला गोळी लागली, तेव्हा कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाहने विचारपूस करत हा वाद मिटवला. त्यानंतर गोविंदाने कृष्णाच्या कॉमेडी शोमध्येही हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनी एकमेकांना मिठी मारत वाद मिटल्याचे संकेत दिले. यावेळी गोविंदाने नेमका काय वाद होता, याविषयी स्पष्टपणे सांगितलं. 2016 मध्ये कृष्णाच्या एका विनोदावरून या वादाची सुरुवात झाली होती.

कृष्णासोबतच्या वादाबद्दल गोविंदा म्हणाला, “आता मी खरं काय ते बोलून टाकतो. एकेदिवशी मी त्याच्यावर खूप चिडलो होतो. त्याला असे कसे डायलॉग्स बोलायला देतात, असं मी भडकून म्हणालो. त्यावर माझी पत्नी सुनिता मला समजावत म्हणाली, संपूर्ण इंडस्ट्री हेच करतेय. तुम्ही कृष्णाला काही बोलू नका. तो त्यातून पैसे कमावतोय आणि त्याला ते काम करू द्या. तुम्ही कोणाला थांबवू नका, कोणाशी चुकीचं वागू नका. त्यामुळे तू तिची माफी माग, ती तुझ्यावर खूप प्रेम करते.” मामाचं हे बोलणं ऐकताच कृष्णा म्हणतो, “हो हो.. माझंही मामीवर खूप प्रेम आहे. तरी माझ्याकडून काही चूक झाल्यास मी त्यांची माफी मागतो. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णा म्हणाला होता, “बऱ्याच काळानंतर मला इतका चांगला अनुभव आला. मी स्टेजवरच म्हणालो की माझा सात वर्षांचा वनवास संपला आहे. आम्ही आता एकत्र आहोत. आम्ही नाचलो, हसलो आणि खूप मजा केली.” काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. तेव्हा कृष्णा त्याची भेट घेऊ शकला नव्हता. याविषयी तो पुढे म्हणाला, “मामाच्या पायाला दुखापत झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यावेळी मी सिडनीमध्ये होतो आणि मी माझ्या आयोजकांनाही शो रद्द करण्याची विनंती केली होती. पण माझी पत्नी कश्मिरा इथे होती आणि सर्वांत आधी तिनेच रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी गोविंदा मामासुद्धा तिच्याशी खूप चांगलं वागले. रक्ताच्या नाती या शेवटी रक्ताच्याच नाती असतात. त्यांची प्रकृतीही आता ठीक आहे आणि आता ते नाचूही शकतायत.”

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.