Govinda | “जर सुनीता नसती तर..”; पत्नीसमोरच गोविंदाने ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करण्याची इच्छा केली व्यक्त

"त्यावेळी ती खूपच तरुण आणि मॉडर्न होती. तिला डेट करताना मला कोणी काही बोलेल याची भीती वाटायची, इतकी ती लहान होती. आम्ही दोघं तरुण होतो", असं गोविंदाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Govinda | जर सुनीता नसती तर..; पत्नीसमोरच गोविंदाने 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला डेट करण्याची इच्छा केली व्यक्त
Govinda with wife SunitaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 8:30 AM

मुंबई : अभिनेता गोविंदा आज बॉलिवूड इंडस्ट्रीत फारसा सक्रीय नसला तरी एकेकाळी फक्त त्याचीच चर्चा असायची. ‘हिरो नंबर 1’या किताब आजसुद्धा गोविंदाचाच आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि नृत्याने गोविंदाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. आजही त्याला टक्कर देणारा अभिनेता इंडस्ट्रीत नाही, असं म्हटलं जातं. मोठ्या पडद्यावर गोविंदासोबत करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळाली. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा त्याला त्याच्या सर्वांत आवडत्या अभिनेत्रीविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने यापैकी कोणतंच नाव घेतलं नाही. त्याऐवजी गोविंदाने इंडस्ट्रीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव घेतलं. इतकंच नव्हे तर या मुलाखतीत पत्नी सुनीता अहुजासमोर गोविंदाने त्या अभिनेत्रीला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीताला जोडी म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं कोणती असेल, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर सुनीताने लगेच माधुरी दीक्षितचं नाव घेतलं. “त्याला माधुरी खूप आवडते”, असं ती म्हणाली. त्यावर गोविंदा पुढे म्हणाला, “आणि रेखाजीसुद्धा. या दोन कलाकारांनी किती वर्षे इंडस्ट्रीत काम केलं आहे. आजपर्यंत कधीच त्यांनी कोणती समस्या निर्माण केली नाही. जी व्यक्ती आतून सुंदर असते त्या व्यक्तीचं बाह्य सौंदर्यसुद्धा कधीच गमावत नाही. या दोन्ही अभिनेत्री आजही तशाच आहेत, जशा त्या इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवल्यानंतर होत्या. जर सुनीता नसती तर मी नक्कीच माधुरीसोबत फ्लर्ट केलं असतं.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न 11 मार्च 1987 रोजी झालं. ज्यावेळी लग्न झालं तेव्हा गोविंदा 24 आणि सुनीता 18 वर्षांची होती. “त्यावेळी ती खूपच तरुण आणि मॉडर्न होती. तिला डेट करताना मला कोणी काही बोलेल याची भीती वाटायची, इतकी ती लहान होती. आम्ही दोघं तरुण होतो”, असं गोविंदाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. गोविंदा आणि सुनीता यांना दोन मुलं आहेत. यशवर्धन असं त्यांच्या मुलाचं नाव आहे तर मुलीचं नाव टिना आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.