गोविंदापासून वेगळं होण्याबद्दल पत्नी स्पष्टच म्हणाली, ‘आम्ही वेगळे राहतो कारण…’
लग्नाच्या 38 वर्षांनंतर गोविंदाच्या खासगी आयुष्याचं मोठं सत्य समोर, अभिनेत्यापासून वेगळं होण्याबद्दल पत्नी म्हणाली, 'आम्ही एकत्र राहत नाही, मी मुलांसोबत मी वेगळी राहते कारण...'

Govinda Wife Sunita Ahuja: बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने त्याच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. वर्षाच्या सुरुवातीला तिने खुलासा केला होता की ती पती गोविंदापासून वेगळी राहते. सुनीताच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या नात्यात अडचणी निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता तिने या अफवा फेटाळून लावल्या आहेत.
मुलाखतीत सुनिता म्हणाली, ‘आमच्याकडे एक बंगला आणि एक अपार्टमेंट आहे. आमचं मंदिर इथे असल्यामुळे आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो. तर गोविंदा घरी उशिरा येतो त्यामुळे तो वेगळं राहतो. याचा अर्थ आमच्या नात्यात अडचणी आहेत असं काहीही नाही…’
View this post on Instagram
यावेळी सुनिता हिने नातेवाईकांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मला आणि गोविंदाला जगात कोणीही वेगळं करु शकत नाही. आमच्या दोघांमध्ये मस्ती-मस्करी सुरु असते. बाहेरच्यांपेक्षा घरातील लोकं असतात ते आपलं घर तोडण्याचा प्रयत्न करतात. पण असं कधीच होऊ देणार नाही. मी माझ्या घराला तडा जाऊ देणार नाही. कुटुंबात अशा काही व्यक्ती असतात जे घर तोडण्याचा विचार करत असतात. पण त्या लोकांना मी कधीच विजयी होऊ देणार नाही. विजय हा माझाच असेल… कारण साईबाबा माझ्यासोबत आहेत…’ असं देखील सुनिता म्हणाली.
View this post on Instagram
आपल्या नवऱ्याला सांभाळून ठेवा – सुनिता
‘आपल्या पतीला कायम सांभाळून ठेवा. ते क्रिकेटप्रमाणे असतात. कधी चांगले तर कधी वाईट… मी नेहमी महिलांना सांगते की, आपल्या नवऱ्याला घट्ट पकडून ठेवा, जसं मी ठेवलं आहे….’ असं देखील गोविंदाची पत्नी सुनिता म्हणाली.
गोविंदा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता आता बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसला तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतो. एक काळ असा होता जेव्हा गोविंदाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.