Video : आफ्रिकन डान्सरच्या जबरदस्त डान्सचे नोरा फतेहे, गुरू रंधावाही झाले फॅन
सोशल मीडिया स्टार किली पॉलनेही गुरू रंधावा आणि नोराच्या या गाण्यावर डान्स करत आपला जलवा दाखवला आहे. तो व्हिडिओ गुरू रंधावाने शेअर केला आहे.
मुंबई : गुरू रंधावाची गाणी नेहमीच हीट ठरतात. त्याचे अलिकडेच ‘नाच मेरी राणी’ हे गाणं रिलीज झाले आहे. काही दिवसातच या गाण्याला 40 मिलियनपेक्षाही जास्त लोकांनी पाहिले आहे. हे गाणं पाहून नेटकरी याचे रिल्स बनवत आहेत. सोशल मीडिया स्टार किली पॉलनेही गुरू रंधावा आणि नोराच्या या गाण्यावर डान्स करत आपला जलवा दाखवला आहे.
नोरा फतेहीच्या गाण्यावर सोशल मीडिया स्टार थिरकले
सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जो रातोरात कुणालाही फेमस करु शकतो. लोक इथे आपला टॅलेंट दाखवतात आणि त्यांना अनेक मोठ्या संधीही मिळतात. त्यामुळेच किली पॉल आणि नीमा प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. आफ्रिकन भाऊ-बहिनीची ही जोडी बॉलिवूडमधील गाण्यांवर रिल्स आणि व्हिडिओ बनवताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘राता लंबिया’ गाण्यावर बनवलेला व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.
View this post on Instagram
नोरा आणि गुरूकडून व्हिडिओ पोस्ट
राता लंबिया गाण्यावर बनवलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. सिद्धार्थ म्हल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या गाण्यावर डान्स केल्यानंतर आता त्यांनी गुरू रंधावा आणि नोरा फतेही यांच्या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही लक्षात आले असेल कि सोशल मीडियात बॉलीवूडची किती क्रेझ आहे. हा जबरदस्त डान्स पाहिल्यावर गुरू रंधावालाही हा व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरला नाही. त्याने आणि नोरा फतेहीने त्यांच्या इन्स्टग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
इतर बातम्या: